आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ महोत्सवावर स्वतंत्र अॅप!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाळूज येथील आयसीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणकशास्त्राच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या मुलांनी संपूर्ण जगाला वेरूळ महोत्सवाची माहिती देण्यासाठी एक अॅप विकसित केले आहे. यात तब्बल तेहतीस वर्षांतील महोत्सवांची माहिती आणि आगामी महोत्सवांची माहिती एका क्लिकवर मिळेल. जागतिक अभियंतादिनी मुलांनी एमटीडीसीला ही अनोखी भेट दिली आहे.

वेरूळ महोत्सवाला तेहतीस वर्षांचा इतिहास आहे, हे अनेकांना माहिती नाही. १९८३ ते २०१२ पर्यंत वेरूळ महोत्सव झाला. त्यानंतर दुष्काळामुळे सलग चार वर्षे तो होऊ शकला नाही. यंदा हा महोत्सव शासनातर्फे आयोजित केला आहे. वाळूज येथील आयसीएम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी हे अनोखे अॅप तयार केले असून शहराच्या विकासात खारीचा वाटा म्हणून ते एमटीडीसीला मोफत सुपूर्द करण्याचा संकल्प केला आहे.

असे तयार केले अॅप : महेश निपाणे, दिव्या चांडक, अपूर्वा शिंदे, सोनाली शिंदे, स्वाती राठाेड, अदिती निकाळजे, ऋषिकेश वरे यांना प्राध्यापक अशोक हजगुडे प्रा. कविता शिंगी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. एमटीडीसीत जाऊन ३३ वर्षांतील महोत्सवाची माहिती सचित्र जमा केली. ती अँड्रॉइड अॅपवर अपलोड केली. गुगल प्ले स्टोअरमध्ये एलोरा फेस्टिव्हल टाइप केले की सहज हे अॅप उपलब्ध होईल. जावा या संगणकीय भाषेेचा वापर करून पंधरा दिवसांत हे तयार केले. यात अजिंठा वेरूळसह औरंगाबादेतील ऐतिहासिक पर्यटन स्थळांची माहितीही दिलेली आहे.

स्तुत्य उपक्रम...
सोशल मीडियाच्या माध्यमातून वेरूळ महोत्सवाची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचणार आहे. या अॅपची आम्हाला महोत्सवासाठी मदतच होईल. अण्णासाहेब शिंदे, एमटीडीसी
बातम्या आणखी आहेत...