आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डीत पकडलेला सीरियल किलर रामदास वैष्णव औरंगाबादचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिर्डी येथे भिका-यांच्या साखळी हत्याकांडाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला आरोपी सचिन रामदास वैष्णव (28) औरंगाबादच्या माळीवाडा भागातील रहिवासी आहे. दोन दिवसांपूर्वीच शिर्डी पोलिसांनी त्याला अटक केली. पुणे रेल्वे स्टेशनवर मारहाण करून भिका-यांनी खिशातील पैसे काढून घेतल्याचा राग मनात ठेवून त्याने शिर्डीत तीन भिका-यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.


‘सीरियल किलर’ने औरंगाबादेत दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याचे शिर्डीच्या पोलिस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनी शनिवारी सांगितले. त्याने आतापर्यंत सहा खून, दोघांवर प्राणघातक हल्ला केला आहे. औरंगाबादेत भिका-यांची हत्या तसेच लातूर व कन्नड येथेही त्याने खून केल्याचा पोलिसांचा कयास आहे.
सचिन काळीपिवळीचा चालक होता. दीड वर्षापूर्वी तो घरातून निघून गेला. त्याचा मोठा भाऊदेखील चालक आहे. शिर्डीमध्ये भिका-यांच्या हत्यांचे सत्र सुरू होते. मात्र मारेकरी पोलिसांना गुंगारा देत होता. मारेक-याला ओळखण्यासाठी पोलिसांनी 84 भिका-यांना ताब्यात घेतले होते. या सर्व भिका-यांचे फिंगरप्रिंट्स पोलिसांनी तपासले. त्यामध्ये सचिनचे फिंगरप्रिंट्स मारेक-याशी जुळल्याने पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली. पोलिसांनी सचिनच्या आई-वडिलांना दोन दिवसांपूर्वी माळीवाड्याहून ओळखपरेडसाठी शिर्डीला नेले होते. त्यांनी सचिन आपलाच मुलगा असल्याचे सांगितले. लातूर येथे एक, रेल्वेमध्ये झालेल्या दोघांच्या तसेच कन्नड येथे 9 नोव्हेंबर 2012 रोजी झालेल्या खुनाचाही त्याच्यावर संशय आहे.