आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताची मालिका एक ठार; तीन जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - सिल्लोड राज्य महामार्गावर सोमवारी वेगवेगळ्या चार अपघातांत एक ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.यात दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुंबईहून मध्य प्रदेशकडे जाणारे टिप्पर ( एम.एच. ०५ -ए. एम. २७ ३७) ला पाथ्री फॉरेस्टीजवळ आैरंगाबादकडे जाणारी दुचाकी (एम.एच. २० - टी.सी. ११८ (विना परवाना) टिप्परच्या मागील चाकास भिडल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. टिप्पर चालकास पळून जाताना खामगाव फाट्यावर पकडले. दुसरा अपघात दुपारी ४ वाजेच्या सुमारास केऱ्हाळा फाट्यादरम्यान घडला. या मध्ये बुलडाणा डेपोची बस (एम. एच. ४० एन ८७०४) ही बुलडाण्याहून औरंगाबादकडे जात होती. दरम्यान होंडा कंपनीची विनापासिंग दुचाकीने बस चालकाच्या बाजूस धडक दिली. यात देविदास शेनफडू जावळे (४०) हे गंभीर जखमी झाले. त्यांना सिल्लोड येथील उपरुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बसचालक भाऊसाहेब हसनराव देशमुख (रा.देऊळगाव घाट) जिल्हा बुलडाणा यास पोलिसांनी अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला. तिसरा अपघात खामगाव फाटा येथे रस्ता ओलाडताना झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात खामगाव येथील गणपत मोहिते (५५) बजाज दुचाकी (एम. एच. २० सी. एन. ५५२७) हे रस्ता ओलांडताना सिल्लोडहून औरंगाबादकडे जाणारी दुचाकी (एम. एच. २० ए. व्ही. ८९८६) वरील चालक शेख हनिफ शेख अब्दुल रहेमान (४७ रा. पारध) तसेच सहा वर्षांचा मुलगा जखमी झाले. या दोघा किरकोळ जखमींना फुलंब्री येथील खासगी दवाखान्यात उपचार करून घरी पाठवले. य चौथा अपघात उमरावती (ता. फुलंब्री) येथील कारभारी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बोरगाव अर्ज फाटा येथे झालेल्या अपघातात राजू कारभारी जाधव यास गंभीर जखमी केले. मालवाहू अपे (एम. एच. २० डी. ३९४५) हा अपघात स्थळावरून पळून गेला. या चालकाचे नाव कळू शकले नाही. राजू जाधव मोटारसायकलवरून एम. एच. १४ ए. एक्स. ६९४६ वर घराकडे जात असताना धडक दिली. यात मुलास गंभीर जखमी केले असल्याचे त्याचे वडील कारभारी जाधव यांनी सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून त्या मालवाहू अपेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व गुन्ह्यांच्या नोंदीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नरहरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वडोद बाजार पोलिस करीत आहे. अपघाताच्या या तीन घटनांमुळे त्या त्या ठिकाणच्या परिसरातील घटनास्थळापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...