आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूटमारीचा गुन्हा कबूल, महिलेस सक्तमजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडको टाऊन सेंटर येथील कपड्याच्या व्यापाऱ्यास महिलेने कारमध्ये लिफ्ट मागून त्याला हर्सूल - सांवगी टोलनाक्याच्या समोर नेऊन मारहाण करून कार, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. हा गुन्हा त्या महिलेने प्रथम तदर्थ न्यायाधीश आर. आर. काकाणी यांच्यासमोर कबूल केल्यामुळे त्या महिलेस चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

सिडको टाऊन सेंटर येथील कपड्याचे व्यापारी सुमित सुरेंद्र गुप्ता हे एप्रिल २०१३ रोजी रात्री दुकान बंद करून कारमधून घरी निघाले असता दोन तीन दिवसांपूर्वी दुकानात स्कार्प घेण्यासाठी जिन्सपँट आणि टी. शर्ट घालून अालेली महिला तिला समोरच्या सिटवर बसविले. हर्सूल - सांवगी टोल नाका आल्यावर त्या महिलेने पुन्हा समोर म्हणून नाक्यापासून १०० मीटर दूर असलेल्या ओबडधोबड रस्त्यावर नेले. दरम्यान भरधाव दुचाकी आली. त्या दुचाकीवरून चार जण खाली उतरले आणि त्यांनी गुप्ता यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याच्या कंबरेला धारदार शस्त्र लावून दोन तोळ्याचे ब्रेसलेट, तीन तोळ्याची साखळी, रोख हजार रुपये आणि कार घेऊन महिलेसह तिघांनी पळ काढला होता. त्या कारच्या डिकीत हँडबँगेत रोख लाख रुपये दुकानातील धंद्याची रोख १३ हजार रुपये एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीएच, अॅक्सिस बँकांची चेकबुक्स असे ११ लाख ९७ हजार रुपयाचे साहित्य चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक हरीश खटावकर यांच्या पथकाने व्यापाऱ्यास लुटमार करणारी महिला नीलम बापू खोमणे (रा. नगर), अनिल बाबूराव खोतकर (रा. पुंडलिकनगर), कालेबहादूर ऊर्फ टिकाराम रुख बहादूर शिवजली रा. नेपाळ या तिघांना अटक केली. त्याच्या ताब्यातून कार आणि रोख लाख ६८ हजार रुपये जप्त करण्यात आले. प्रथम तदर्थ न्यायाधीश आर. आर. काकाणी यांच्या समोर सुनावणी सुरू असताना नीलमने गुन्ह्याची कबुली दिली. सहायक लोकअभियोक्ता राजेंद्र मुगदिया यांनी सचिन ठकसेन काळे आणि प्रशांत घुसळे या दोघांना न्यायालयाने फरार घोषित केल्याचे सांगितले.
दबावाखाली कबुली नाही
कोणाच्याहीदबावाखाली किंवा आमिषाला बळी पडून कबूल करीत नसल्याचे तिने न्यायालयास सांगितले. न्यायालयाने नीलम बापू खोमणेस दोषी ठरवून चार वर्षे सक्तमजुरी, हजार रुपये दंड, दंड भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. नीलम खोमणे २००६ पासून न्यायालयात असून ती शिक्षादेखील गृहीत धरावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...