आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Setup Box Issue At Aurangabad 31 March Last Date

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेट टॉप बॉक्स नसेल तर 31 मार्चनंतर टीव्हीवर फक्त मुंग्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डीटीएच (डायरेक्ट टू होम) किंवा सेट टॉप बॉक्स लावला नाही, तर येत्या 31 मार्चला रात्री बरोबर 12 च्या ठोक्याला तुमच्या टीव्हीला मुंग्या येणार आहेत. त्यामुळे डीटीएच किंवा सेट टॉप बॉक्स खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत होत असून गेल्या अनेक वर्षांपासून केबलद्वारे टीव्ही पाहणार्‍यांची खरी संख्या यामुळे समोर येणार आहे. शहरातील अधिकृत केबल ग्राहकांची संख्या 47 हजार 361 इतकी असतानाच त्याच एमसीएनकडून आतापर्यंत 70 हजारांवर सेट टॉप बॉक्सची विक्री झाली असून 31 मार्चनंतर हा आकडा आणखी 50 हजारांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

31 मार्चला टीव्ही पूर्णत: बंद झाल्यानंतर डीटीएच तसेच सेट टॉप बॉक्सच्या खरेदीत वाढ होईल, असा व्यापार्‍यांचा अंदाज आहे. 31 मार्चला नेमक्या किती टीव्हींवर मुंग्या दिसतील याचा निश्चित आकडा कोणीही सांगू शकत नाही. 5 ते 10 मार्चनंतर शहरातील टीव्हींची संख्याही स्पष्ट होऊ शकेल आणि प्रशासनाच्या महसुलात दुपटीने वाढ होईल, असा अंदाज आहे.

औरंगाबाद शहरातील सध्याचे चित्र असे

असे आहेत दर
एमसीएन सेट टॉप बॉक्स : 900 रुपये
व्हिडिओकॉन : 2190
एअरटेल : 2190
टाटा स्कॉय : 2190
बिग टीव्ही (रिलायन्स) : 2190
डिश टीव्ही : 2190
दूरदर्शनचे डीटीएच :1890 रुपये. याला करमणूक कर लागत नाही. कारण फ्री टू एअर चॅनल्स यावर दिसतात.
प्रत्येक कंपनीचे मासिक शुल्क पॅकेजनुसार ठरते. 120 रुपयांपासून ते 750 रुपयांपर्यंत हे शुल्क आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डीलर्सकडून प्रतिजोडणीसाठी वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

0 मालमत्ता : अडीच लाख
0 एकापेक्षा जास्त टीव्ही संच असणारी घरे : 10 हजार
0 हॅथवे एमसीएनकडील केबल जोडणी- 47 हजार 361
0 केबल ऑपरेटर्स - 210
0 एमसीएनच्या सेट टॉप बॉक्सची विक्री- 70 हजारांवर
0 डीटीएच- 87 हजार 698
0 केबल जोडणीतून यंदा फेब्रुवारी (2012-13) अखेरीस तिजोरीत आलेली रक्कम- 2 कोटी 23 लाख
0 फेब्रुवारीअखेर प्राप्त महसूल- 4 कोटी 44 लाख
0 एकूण- 6 कोटी 67 लाख


31 मार्चनंतर विक्री वाढणार
31 मार्चनंतर बॉक्सची विक्री वाढण्याची शक्यता आहे. टीव्ही बंद झाल्यानंतरच अनेक जण खरेदीसाठी येतील, कारण या मुदतीत पुन्हा वाढ होऊ शकते.टीव्ही असणार्‍या घरांची संख्या केबल संख्येपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट होते.’’ दि. वा. डहाळे, उपमहाव्यवस्थापक, हॅथवे एमसीएन

पुढील वर्षात महसूल वाढेल
निर्णयामुळे काही दिवसांपासून डीटीएचची संख्या वाढत आहे. पुढील वर्षात महसूल आणखी वाढणार हे नक्की आहे. डीटीएच आणि सेट टॉप बॉक्सची संख्या स्पष्ट झाल्यानंतर आम्ही महसुलाचा अंदाज काढू शकू.’’
-ए. के. पावडे, सहायक करमणूक कर अधिकारी

परीक्षांमुळे निर्णय लांबणीवर
परीक्षांचे दिवस असल्याने अनेकांनी हा निर्णय पुढे ढकलल्याचे दिसून येते. येत्या काही दिवसांत विक्रीत वाढ होईल. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डीलर्सने वेगवेगळ्या स्कीम दिल्या आहेत. कंपन्यांकडून मात्र अशा स्कीम नाहीत.’’ -अजय शहा, डीलर.

असा आहे करमणूक कर
0 मनपा हद्द- 45 रुपये दरमहा
0 अ व ब दर्जाच्या नगरपरिषदा- 30 रुपये
0 क वर्ग नगर परिषदा आणि ग्रामीण क्षेत्र - 15 रुपये प्रतिजोडणी

अशी होईल करआकारणी
डीटीएच जोडणी घेतल्यानंतर त्याची नोंद जिल्हाधिकारी मुंबई यांच्याकडे होईल. कंपन्यांकडून तेथेच करमणूक कराची वसुली केली जाईल. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील जोडण्यांनुसार त्या-त्या जिल्ह्याला महसूल दिला जाईल. एमसीएनच्या सेट टॉप बॉक्सचा कर एकरकमी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला जाईल.