आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसखाली उतरताच सात लाख पळवले, अवघ्या पाचच मिनिटांत चोरट्याने मारला डल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुंबईला जाण्यास निघालेल्या प्रवाशाने आपली बॅग आराम बसमध्ये ठेवून तो भावाला बोलण्यासाठी खाली उतरला. तेवढ्याच वेळात चोरट्याने संधी साधून बॅगेतील सुमारे ६.९० लाख रुपये लंपास केले. पाचच मिनिटांत घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी पोलिसही चक्रावून गेले.
दीपक चंद्रमोहन कामतीकर (५०, रा. मुलुंड, मुंबई) यांनी शहरातील त्यांच्या जमिनीचा व्यवहार केला होता. २० सप्टेंबर रोजी मुंबईला जाण्यासाठी त्यांनी रात्री १२ च्या स्लीपर बसचे तिकीट बूक केले होते. शहानूरमियाँ दर्गा येथील थांब्यावर त्यांचा भाऊ सोडण्यासाठी आला होता. दीपक यांनी आपली बॅग सीटवर ठेवून भावाला बोलण्यासाठी बसमधून उतरले. भावाशी चार ते पाच मिनिटे गप्पा मारल्यानंतर बस निघायची वेळ झाल्याने ते बसमध्ये जाऊन बसले असता त्यांना बॅगचे कुलूप तुटलेले तसेच त्यातील लाख ९० हजार रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी २१ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केल्यानंतर जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास जमादार यमाजी खटाणे करत आहेत.

प्रवासी ताटकळले : जवाहरनगरपाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मंडाळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बससह सर्वच प्रवाशांची झडती घेतली. मात्र, रक्कम आढळल्याने सुमारे दीड ते दोन तास प्रवासी ताटकळले.

ओळखीच्या व्यक्तीचे काम?
कामतीकर यांच्याकडे तीन बॅग होत्या. त्यातील रक्कम असलेल्याच बॅगचे कुलूप तोडून चोरट्याने रक्कम लंपास केली. त्यामुळे ओळखीच्याच व्यक्तीचे हे कारस्थान असल्याचा संशय पोलिसांना आहे.
बातम्या आणखी आहेत...