आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Crore Sanction For The Underground Drainage Line In Aurangabad

रुळापलीकडे पाइप नेण्यासाठी 7 कोटी, ट्रेंचलेस टेक्नाॅलाॅजी वापरण्याचा रेल्वेचा अाग्रह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -भूमिगत गटार योजनेच्या पाइपलाइन रेल्वे रुळाखालून नेण्यासाठी चर खणता ट्रेंचलेस टेक्नाॅलाॅजीचा वापर करण्याच्या अटीवर रेल्वेने परवानगी दिल्याने आता मनपाला या नवीन तंत्राने पाइपलाइन टाकण्यासाठी कोटी ७९ लाख रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. मनपाची तकलादू आर्थिक स्थिती पाहता या खर्चाला मंजुरी मिळाली तरी शहरात पाच ठिकाणी ही कामे करण्यासाठी विलंब होण्याचीच अधिक शक्यता आहे.

शहरात केंद्र सरकारच्या आर्थिक साहाय्याच्या बळावर भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. मुख्य मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून अंतर्गत वाहिन्यांचे कामही २३ टक्के झालेे आहे. याशिवाय कांचनवाडी झाल्टा येथे मलजल प्रक्रिया केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे.
घारपुरे-खिल्लारे ही कंपनी हे काम करत असून आता रेल्वेपुलाखालून मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम थांबले आहे.

रेल्वेनेदिला नकार
यापाइपलाइन बदलण्यासाठी मनपाने रेल्वेकडे परवानगी मागितली असता ती नाकारण्यात आली. रेल्वेने सांगितले की, नवीन धोरणानुसार रेल्वे पुलाखालून मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याऐवजी रेल्वे रुळांखालून टाकण्यात यावी त्यासाठी चर खणता ट्रेंचलेस टेक्नाॅलाॅजीचाच वापर करावा. जून रोजी रेल्वेने पाठवलेल्या पत्रात तसे कळवले आहे. शिवाय याबाबत सविस्तर अंदाजपत्रक तयार करा आमच्या मंजुरीसाठी रेल्वेखात्याकडे पुढील तपासणीसाठी सादर करा, असे सांगण्यात आले.

अंदाजपत्रक तयार
रेल्वेच्या सूचनेनुसार रेल्वे रुळाखालून मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या दरसूचीनुसार मनपाने कोटी ७९ लाख २५ हजार ५२० रुपयांचे सविस्तर अंदाजपत्रक तयार केले आहे. या कामासाठी रेल्वे रुळाखालच्या जागेच्या भाडेपट्ट्याची मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याच्या खर्चाची रक्कम मनपाने रेल्वेला द्यायची आहे. मनपाने अंदाजपत्रक रेल्वेला दिले आहे. आता २० सप्टेंबर रोजी रेल्वेसोबत चर्चेनंतर मनपाने रक्कम भरल्यावर काम सुरू करता येणार आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे ट्रेंचलेस तंत्रज्ञान आणि शहरात कुठे कुठे टाकणार भूमिगत पाइपलाइन...