आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या मतदार नोंदणीसाठी सात दिवसांची मुदतवाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डाॅ.बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिकार मंडळांच्या निवडणुकांच्या मतदार नोंदणीसाठी १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात अाली अाहे. पूर्वी १२ जुलैपर्यंत मुदत होती. मात्र मतदार नोंदणीला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. 

अामदार इम्तियाज जलील यांनी मतदार नोंदणीसाठी आणखी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कुलगुरू डाॅ. बी. ए. चोपडे यांच्याकडे केली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. प्रदीप जब्दे यांनी ११ जुलै रोजी मतदार नोंदणीला मुदतवाढ दिल्याचे पत्र जारी केले अाहे. या मुदतवाढीमुळे मतदारंना आता १९ जुलै अाॅनलाइन तर २२ जुलैपर्यंत अाॅफलाइन पद्धतीने मतदार नोंदणीचे अर्ज सादर करता येणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...