आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात हजार शेतकऱ्यांना केल्या शेतजमीन आरोग्यपत्रिका वाटप, उत्पन्नातही वाढ होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांनी वर्षभरात जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळेतून माती परीक्षण करून घेतले असून यातून त्यांना जमिनीची सुपीकता समजली आहे. त्यानुसार फळबाग विविध पिकांची लागवड करणे, खतांचा समतोल वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे सहज शक्य होणार आहे.
माती परीक्षण करून सुपीकतेविषयी माहिती जाणून घेण्यात शेतकरी कृषी विभागाने आजपर्यंत कमालीची अनास्था दाखवली. यामुळे जमिनीचा पोत खालावल्याने नापिकीचा धोका वाढला. उत्पादनात घट येत असल्याने शेती तोट्यात आली. उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांना शेतजमिनीचा पोत कळण्यासाठी माती परीक्षण करून जमीन आरोग्यपत्रिका वाटप करण्याचा निर्धार केला. त्यासाठी देशातील सर्व जिल्हा माती परीक्षण प्रयोगशाळांना निर्देश दिले आहेत. तत्पूर्वीच जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने माती परीक्षणास सुरुवात केली होती. पंतप्रधानांच्या निर्णयाने त्याला आणखी गती मिळाली असून एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१५ पर्यंत सात हजार शेतकऱ्यांच्या मातीचे नमुने विनामूल्य तपासण्यात येऊन जमीन आरोग्यपत्रिका वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.
या अन्नघटकांची कमतरता माती परीक्षणातून उघड : अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करत असून वर्षानुवर्षे एकच पीक घेतले जात आहे. यामुळे जमिनीची झीज भरून निघण्याऐवजी ती खालावत चालली आहे. त्यात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ६० ते ८० टक्क्यांनी घटले असून पीएचचे प्रमाण वेगाने वाढत आहे. नत्राचे प्रमाण अत्यल्प आहे. स्फूरदची उपलब्धता फारच कमी होत आहे. गंधकाचे प्रमाण ३० ते ४० टक्यांनी कमी आहे.
मातीचे कण, जमिनीतील हवेचे प्रमाण आणि ओलावा कमी झाला आहे. शेतीच्या पृष्ठभागातील गांडुळासारखे शेतीमित्र जिवाणू नष्ट झाले आहेत. जमीन चोपण क्षारयुक्त झाली आहे. आम्लतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतीला नापिकीचा धोका वाढल्याचे माती परीक्षणातून समोर आले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, या उपाय योजना करणे आवश्यक आणि नागरिकांनाही लाभ...
बातम्या आणखी आहेत...