आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: प्रोझोन मॉलमधील 2 स्पामध्ये वेश्याव्यवसाय; थायलंडच्या 12 तरुणी ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींना पोलिसांनी अटक केली. - Divya Marathi
वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींना पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद-  शहरातील प्रोझोन मॉलमधील दोन फॅमिली स्पा सेंटरमध्ये थायलंडच्या 12 मुली वेश्या व्यवसाय करत असल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी (7 नोव्हेंबर) रात्री नऊ वाजता समोर आला. या मुलींसह ग्राहक, स्पा सेंटरचे कर्मचारी व्यवस्थापकांना अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विशेष म्हणजे, पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे यांनी वाहतूक अॅडमिनिस्टेशन महिला तक्रार निवारण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घेऊन छापा मारला.

 

अनेक दिवसांपासून मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील दाेन स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांनी छापा मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो यशस्वी झाला नव्हता. अखेर गुरूवारी पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये दोन डमी ग्राहक पंच पाठवले. त्यांनी सेंटरच्या व्यवस्थापकाशी बोलणी केली. पाच हजारांचा सौदा तीन हजार रुपयांवर ठरला. मग डमी ग्राहकांनी इशारा केला आणि पोलिसांच्या दोन पथकांनी एकाच वेळी दोन्ही सेंटरवर छापा टाकला. तेथून रोख रक्कम, थायलंडच्या मुलींचे पासपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज इतर साहित्य जप्त करण्यात आले. कारवाई पथकात महिला तक्रार निवारण केंद्राच्या किरण पाटील, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे सुरेंद्र माळाले, उपनिरीक्षक संदीप शिंदे, संदीप बिरारी यांचा समावेश होता.

 

विदेशी तरुणाला बंदूक रोखून घेतले ताब्यात : कारवाईच्या वेळी अात ग्राहकांमध्ये एक विदेशी तरुणही होता. छापा पडताच त्याने पोलिसांची झटापट करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांना त्याला अडवण्यासाठी त्याच्यावर शेवटी बंदूक राेखावी लागली.


दाेन्ही स्पा सेंटर मागिल तीन वर्षांपासून माॅल मध्ये सुरू आहे. शहरातील उच्चभ्रू वर्ग या स्पा सेंटरचे सभासद आहेत. सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. अडीच वर्षानंतर पोलिसांना या उच्चभ्रू वेश्या व्यवसायाची माहिती मिळाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.


पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ व फोटोज...

बातम्या आणखी आहेत...