आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील व्हिडिओ क्लिप काढून विवाहितेचा छळ, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी दिला त्रास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सासरच्या मंडळींनी सूनेची अश्लील िव्हडिओ क्लिप काढून तिला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार हर्सूलजवळील हरिसिद्धी नगरात घडला. सिडको पोलिस ठाण्यात तक्रार घेता चालढकल केल्याचा आरोप हेड कॉन्स्टेबलवर ठेवण्यात आला. पीडित महिलेला पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी तपास अधिकारी बदलण्याचे आश्वासन दिल्याचे त्या महिलेने सांगितले.

सहा महिन्यांपूर्वी प्रीतीचे (नाव बदलले आहे) काका-मावशीने साडेतीन लाख रुपये देऊन डॉ. सुनील साहेबराव देवरे याच्याशी विवाह लावला होता. त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमी मारहाण व्हायची, असे तक्रारीत म्हटले आहे. शिवाय नणंदेने अश्लिल व्हिडिओ क्लिप तयार केल्याचा आरोप तिने केला आहे. सासरच्या मंडळीने तिच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणीही केली होती. पैसे देत नाही म्हणून महिनाभरापूर्वी तिला घरातून हाकलण्यात आले होते. तेव्हापासून प्रीती माहेरी राहते. देवरे हा डॉक्टर असून सुलतानपूर येथे त्याचे साई हॉस्पिटल आहे. प्रीतीने नवरा, सासू, सासरे, नणंद आणि दीर अशा सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

मावशी-मामांना मारहाण
देवरेयांनी प्रीतीला न्यायालयाच्यामार्फत "परत नांदायला ये' अशी नोटीस पाठवली होती. या नोटिसीला उत्तर म्हणून प्रीतीची मावशी मामा न्यायालयात गेले होते. हे प्रीतीच्या नवऱ्याला कळताच त्याने त्या दोघांना बाहेर येताच आमच्या विरोधात तक्रार का देतात असे म्हणत भररस्त्यात मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. क्रांती चौक पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.