आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ जाहीर करण्याची धमकी देत वर्षे बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बलात्काराचे चित्रीकरण जाहीर करण्याची धमकी देत चार वर्षे विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या तसेच तिच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रशांत अशोक अवसरमल (अंदाजे २८, रा. मयूर पार्क) असे आरोपीचे नाव असून सध्या तो फरार आहे. तीसवर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, २०१२ मध्ये तिची प्रशांतसोबत ओळख झाली. प्रशांतने तिचा विश्वास संपादन करून एकेदिवशी सावंगी भागात प्लॉट दाखवण्याचा बहाणा करून पीडितेला बाहेर नेले. कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करत त्याचे चित्रीकरणही केले. हे चित्रीकरण जगजाहीर करण्याची धमकी देऊन त्याने चार वर्षे बलात्कार केला. यानंतर त्याने पीडितेच्या अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे सुरू केले. शिवाय महिलेकडे आठ लाख रुपये देण्याचा तगादा लावला. अखेर पीडितेने सिडको ठाणे गाठून तक्रार दिली असता प्रशांतवर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रशांतने चित्रीकरण जाहीर करण्याची धमकी देत पीडितेवर वारंवार बलात्कार केला. त्याचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने पीडितेने त्याच्या आई, वडिलांना हा प्रकार सांगितला, परंतु त्याच्या आईने हा प्रकार ऐकल्यानंतर त्याला काय करायचे ते करू दे, असा विचित्र सल्ला देत मुलाच्या कृत्याचे समर्थन केले. २०१२ मध्ये सुरू झालेल्या या प्रकारानंतर पीडित मुलीसोबतही अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्याचा जाच वाढत असल्याने तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. ऑक्टोबर रोजी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...