आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sfs Ground Dandiya Program, Stage Gallery Collapsed, 15 Woman Injured In Aurangabad

दांडियाची गॅलरी पडली; 15 महिला जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एसएफएस मैदानावरील क्रिस्टल स्वरविहार दांडियातील प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने 10 ते 15 महिला जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी रात्री 9.30 घडली. गॅलरीमध्ये जवळपास 150 महिला बसल्याचे प्रत्यक्षदश्रींनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. दांडिया पाहण्यासाठी स्टेजच्या उजव्या बाजूला लाकडांचे मोठे स्टँड उभारण्यात आले होते. स्टँड कोसळल्यानंतर 15 ते 20 मिनिटांपर्यंत परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, पोलिस आणि खासगी सुरक्षा रक्षकांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर रात्री 10 वाजता दांडियास सुरुवात झाली. पोलिसांत मध्यरात्रीपर्यंत या घटनेची नोंद झाली नाही.