आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shaha Kept Eye's On Marathwada To Broke Shivsena

शिवसेनेचा पाया खणण्यासाठी शहांची नजर मराठवाड्यावर, भद्रा मारोतीची केली पुजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुंबई, कोकणापाठोपाठ शिवसेनेची पाळेमुळे मराठवाड्यात रुजली आहेत. प्रत्येक गावात नेटवर्क मजबूत आहे. हा पाया खणण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची नजर मराठवाड्यावर असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी त्यांनी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासोबत शिवसेनेच्या नेत्यांनाही खेचण्याचा प्रयत्न चालवल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या. तरीही बहुमतापासून २२ जागांचे अंतर राहिलेच. त्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याचा शोध भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवरून घेतला जात आहे. एका पदाधिका-याने सांगितले की, शहांनी निकालापूर्वी मराठवाड्यात किमान २६ जागांवर भाजपचे उमेदवार िवजयी होतील, असा अंदाज बांधला होता. गेल्या वेळी म्हणजे २००९ मध्ये फक्त दोन जागा होत्या. त्यामुळे येथे मोठी भरारी घेणार असे त्यांना वाटत होते. प्रत्यक्षात भाजपची मजल १५ जागांवरच थांबली. त्याची गंभीर दखल शहा यांनी घेतली. बीड वगळता अन्य ठिकाणी भाजपचे स्थानिक पातळीवर संघटन मजबूत नाही. आहे त्या पदाधिका-यांमध्ये वाद असल्याने शिवसेनेचेच प्रभुत्व असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यामुळेच त्यांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. या पदाधिका-याने सांगितले की, मराठवाड्यातील भाजपच्या पदाधिका-यांना एकत्रित आणणे, त्यांना सर्व अर्थाने बळ पुरवण्यासाठी पावले टाकण्याचे शहा यांनी ठरवले आहे.ज्या ठिकाणी शिवसेनेत काही अंतर्गत वाद असतील तेथे शिवसेनेच्या बड्या नेत्याला किंवा पदाधिका-याला खेचण्याचाही प्रयत्न करा, असे त्यांचे निर्देश आहेत. त्याचाच एक प्रयोग काल खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर करण्यात आला. अर्थात त्याला महापालिका निवडणुकीचाही धागा आहे. पुढील काळात हाच प्रयोग उस्मानाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यात केला जाऊ शकतो.

पंकजांना टाळले
गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मराठवाड्यातील भाजपचे नेतृत्व पंकजा मुंडेेंकडे असल्याचे मानले जाते. मात्र, शहा यांच्या दोन दिवसांच्या दौ-यात पंकजा त्यांच्यासोबत दिसल्याच नाहीत. त्यामुळे शहांनी त्यांना जाणीवपूर्वक टाळल्याची चर्चा सुरू आहे. परंतु पंकजा कामात व्यग्र असल्याने येऊ शकल्या नाहीत. राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच दौ-याचे नियोजन केले असल्याने शहा यांनी पंकजांना टाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
पुढे वाचा, शिवसेनेशी लवकरच बोलणी...