आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कदीम शहापूरचा ‘बेबीकॉर्न’ मका पुण्याच्या औषधी कंपनीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - औषधी गुणधर्म असलेल्या बेबी कॉर्न मक्याचे पीक वाळूजलगत कदीम शहापूर येथील महिला शेतकऱ्याने घेतले. केवळ ७५ दिवसांत मक्याच्या पिकातून प्रतिटन हजार ५०० रुपये, तर त्याच्या निघालेल्या पौष्टिक चाऱ्यामधून एकरी १० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी खर्च कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणाऱ्या बेबी कॉर्न मका पिकाचे उत्पन्न घेण्याचे आवाहन गंगापूर कृषी विभागाकडून केले जात आहे.
कंपनीशी टायअप
शेतकरीमाया कांबळे यांनी आपल्या शेतीत आतापर्यंत मक्याचे पीक घेतले नव्हते. मात्र, गंगापूर तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, मंडळ कृषी याकूब पठाण, पर्यवेक्षक सुनील वझे, महेबूब झकेरिया आदींशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कांबळे यांनी बेबी कॉर्न मक्याचे पीक घेतले. पिकाला उपयुक्त असा पाऊस झाल्याने पीक जोमदार आले. सध्या पीक ७५ दिवसांचे असून कणसांची काढणी सुरू आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या सहकार्याने पुण्यातील ‘निसर्ग फ्रेश कंपनी’शी टायअप करण्यात आले आहे. ही कंपनी शेतीच्या बांधावर येऊन कणसे खरेदी करून घेऊन जात आहे.

हिरवाचारा अत्यंत पौष्टिक : पिकाच्यालागवडीनंतर ५० दिवसांत झाडांना कणसे लगडतात. कणसे लागल्यानंतर दाणे भरण्यापूर्वीच ही कणसे खुडवून कंपनीला पाठविली जातात. त्यामुळे चारा हिरवागार राहतो. जनावरांसाठी हा चारा अत्यंत पौष्टिक असून त्यामुळे जनावरांच्या दुधामध्ये वाढ होते. या चाऱ्याला एकरी १० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. अशा पद्धतीने शेतकरी कांबळे यांना कणसे चारा मिळून एकरी ३२ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. २८ सप्टेंबर रोजी कंपनीला कणसे पाठविण्यात आली. तेव्हा कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, मंडळ कृषी याकूब पठाण, पर्यवेक्षक सुनील वझे, महेबूब झकेरिया, सिद्धार्थ कांबळे, कृषी सहायक राजेंद्र पंडोरे, श्रीकांत कुलकर्णी, शिवाजी धनायत, गोबिना वैरागळ, संगीता लोहार, आशा मोरे, सुझाता गोसावी यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

{पुण्याच्या कंपनीशी टायअप झाल्याने कणसे घेऊन जाण्याची जबाबदारी जशी कंपनीची आहे तशीच जबाबदारी कणसे तोडून देणाऱ्या संबंधित शेतकऱ्याची आहे. त्यामुळे कणसांच्या कापटांसह शेतकऱ्याच्या हाती रुपये ५० पैसे प्रतिकिलोचा मोबदला मिळत आहे.

{शेतकऱ्याने कणसांची कापटे काढून दिली, तर मग मात्र ४८ रुपये प्रतिकिलोचा भाव मिळतो. परंतु कांबळे या मनुष्यबळ नसल्याने कंपनीला कापटांसह कणसे विक्री करीत आहेत. हे करीत असताना कणसांना दाणे येता कामा नये.

~ ६००० : हे पीक घेण्यासाठी एकरी खर्च येतो
{कणीस केवळ दाणे येण्यापूर्वीची बिट्टी असलेले पाहिजे. तेही ते १० सेंटिमीटर लांबीपर्यंतच असावे. जास्त लांब असलेली किंवा दाणे आलेली कणसे घेतली जात नाहीत हे विशेष. असे मक्याचे पीक केवळ ७५ दिवसांत येते.

बातम्या आणखी आहेत...