आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shaheed Bhagat Singh Adhyasan Center News In Marathi

विद्यापीठात भगतसिंग विचारधारा प्रमाणपत्र परीक्षेचे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शहीद भगतसिंग अध्यासन केंद्रातर्फे ७ फेब्रुवारी रोजी भगतसिंग विचारधारा प्रमाणपत्र परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून २० केंद्रांवर १ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना भगतसिंग यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तक दिले जाते. परीक्षेचे शुल्क १०० रुपये असून विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी ३ हजार, २ हजार व १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार असून विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन डॉ.सुधाकर शेंडगे यांनी केले आहे.