आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahnavaj Husain News In Marathi, BJP, Modi, Divya Marathi

मोदींमुळे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण नाही,शहनवाज हुसेन यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नरेंद्र मोदी यांच्यामुळे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण नाही तर मोदींच्या विकासाच्या धोरणामुळे हा समाज भाजपकडे आकर्षिला जात असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी केला. मुस्लिमांच्या मागासलेपणाला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. ते मंगळवारी बीड येथे गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचाराला जाण्यापूर्वी चिकलठाणा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.


राम मंदिराचा मुद्दा जुनाच : भाजपच्या राम मंदिराचा मुद्दा जाहीरनाम्यात समावेश केल्याबद्दल काँग्रेस तसेच इतर पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या विचारलेल्या प्रo्नाला उत्तर देताना हुसेन म्हणाले, राम मंदिर हा भाजपचा जुनाच मुद्दा आहे. मागील निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये या मुद्दय़ाचा समावेश होता. त्यामुळे त्याचा समावेश केला तरी टीका आणि नाही केला तरी टीका होणारच, असे सांगत त्यांनी राम मंदिराच्या मुद्दय़ाचे सर्मथन केले. मुस्लिमांच्या विकासाबाबत ते म्हणाले, केवळ काँग्रेसमुळेच मुस्लिम समाज मागास राहिला आहे. याउलट मोदींमुळे मुस्लिम मतदार आता भाजपकडे आकर्षित होत आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांचे विधान तोडमोड करून दाखवण्यात आले, असे सांगत हुसेन यांनी शहांची पाठराखण केली.