आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख मेरी गाडी का ड्रायव्हर था ! मितालीने सांगितल्या सेटवरील आठवणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- "जब तुम्हारे पोते होंगे तो उन्हे बताना, शाहरुख मेरी गाडी का ड्रायव्हर था..!' असे खुद्द शाहरुख जेव्हा म्हणाला, तेव्हा विश्वासच बसेना की आपण बॉलीवूड बादशहाच्या गाडीत बसलो आहोत. पण ते सत्य होते, असे "उर्फी' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आगमन करणाऱ्या मिताली मयेकर हिने सांगितले. मितालीने "बिल्लू' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे. शूटिंगच्या वेळी झालेले गमतीदार किस्से तिने "दिव्य मराठी'ला सांगितले.

मितालीने तिच्या शाळेपासूनच्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, आम्ही सहकलाकार म्हणून "बिल्लू'च्या सेटवर असायचो. इतर कलावंतांचे सीन सुरू असेल तेव्हा निवांत वेळ मिळायचा. मग सेटवर असलेली शाहरुखची नवी कोरी, लांबसडक ऑडी गाडी हे आमचे आकर्षण होते. आम्ही दोघे कारला आतून पाहण्याचा प्रयत्न करायचो. एकदा शाहरुखचा सीन सुरू होता. आम्ही पळत गाडीकडे गेलो अन् आत डोकावून पाहू लागलो. तितक्यात शाहरुख तेथे आला. आम्ही घाबरलो; पण तो लगेच म्हणाला, आतून गाडी पाहायची आहे? चला आत बसा. आम्ही चटकन गाडीत बसलो आणि शाहरुखने ड्रायव्हिंग करत पूर्ण सेटवर सैर करवली अन् म्हणाला, जब तुम्हारे पोते होंगे तो उन्हे कहना, शाहरुख हमारा ड्रायव्हर था. ते वाक्य कायम स्मरणात राहिले. पुढे तिने सांगितले की, मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिराची विद्यार्थिनी.
आमच्या शाळेत कम्युनिटी कार्यशाळा चालतात. त्यातील अभिनय कार्यशाळेत मी प्रशिक्षण घेत असताना आमच्या शिक्षिका विद्या बापट यांनी मला "बिल्लू'च्या ऑडिशनसाठी निवडले. इरफान खान आणि लारा दत्ता यांच्या मुलीची भूमिका मला मिळाली. या चित्रपटानंतर असंभव, अनुबंध आणि उंच माझा झोका यासारख्या मालिकांतून मी भूमिका केल्या, पण दहावीसाठी गॅप घेतला. तीन वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर यायलाच हवे हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. उर्फीसाठी नायिकेचा शोध सुरू होता. मी ऑडिशनला गेले. १२०० मुलींमधून माझी निवड झाली, असे मितालीने सांगितले.

माझा आदर्श दीपिका
"बिल्लू'च्या सेटवर माझी दीपिका पदुकोनशी भेट झाली. पडद्यावर अभिनयाने भारावून टाकणारी दीपिका प्रत्यक्ष आयुष्यातही अतिशय हुशार आहे, याचा अनुभव मला तेव्हा आला. दीपिकाच माझी आदर्श आहे. पुढील करिअरमध्ये मला ऐतिहासिक भूमिका करण्याची जबरदस्त इच्छा आहे. विशेषत: शिवछत्रपतींच्या आयुष्यावरील चित्रपटात एखादी भूमिका साकारण्याची माझी मनीषा आहे. क्वीन चित्रपटातील कंगना रनोटसारखी एखादी भूमिका मिळाली तर खूप आनंद होईल, असेही मितालीने सांगितले.
पुढील स्‍लाइडवर पाहा मिताली मयेकरचे फोटो...