आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिन बदलने के इंतजार में हैं, आइए आप भी कतार में हैं', शाम -ए- गझलमध्‍ये शायरीने केले रसिकांना अंतर्मुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आझाद कॉलेज मैदानावर रंगलेल्या मुशायऱ्याचा कार्यक्रम. - Divya Marathi
आझाद कॉलेज मैदानावर रंगलेल्या मुशायऱ्याचा कार्यक्रम.
औरंगाबाद - नोटबंदीमुळे देशभर निर्माण झालेल्या हलकल्लोळाचे वर्णन करणाऱ्या राजेश रेड्डींच्या ‘दिन बदलने के इंतजार में हैं, आइए आप भी कतार में हैं’ या शेरने असेल किंवा काळ्या पैशाच्या विरोधातील मोहिमेवर तिरकस भाष्य करणाऱ्या डाॅ. वसीम बरेलवी यांच्या ‘गरीब लहरों पे पहरे बिठाए जाते हैं, समंदरों की तलाशी कोई नहीं लेता’ या शेरने असेल, शुक्रवारी सायंकाळी औरंगाबादकर रसिकांना देशभरातून आलेल्या शायरांनी अंतर्मुख करायला लावले. 
 
उम्मीद कल्चरल फाउंडेशनच्या वतीने डाॅ. रफिक झकेरिया कॅम्पसमधील नवल टाटा स्टेडियममध्ये आयोजित आॅल इंडिया मुशायऱ्यात देशातील नामवंत शायरांनी आपले कलाम सादर केले. प्रेम, प्रेमाची व्याकुळता या शायरीच्या नेहमीच्या विषयांशिवाय ताज्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या रचनांनी रसिकांना वास्तवाची जाणीव करून दिली. ख्यातनामशायर डाॅ. वसीम बरेलवी यांनी त्यांच्या ताज्या काही लोकप्रिय रचना सादर करताना कडवट भाष्य केले. 
 
वो झुठ बोल रहा था बडे सलीके से 
मैं ऐतबार करूं तो और क्या करता 
या ओळींनी कडाडून दाद घेतली. राजेश रेड्डी यांनीही आपल्या आजच्या काळातील प्रश्नांना हात घालणाऱ्या रचना सादर केल्या. 
 
शाम को जिस वक्त खाली हाथ घर जाता हूँ मैं 
मुस्कुरा देते हैं बच्चे और मर जाता हूँ मैं 
या शेरने ऐकणाऱ्यांच्या मनात कळ आणली तर, 
बहाना कोई तो जिंदगी दे 
जीने के लिए मजबूर हो जाऊ मैं 
असे नैराश्याच्या वातावरणातील आजच्या माणसाचे वर्णन त्यांनी केले. 
 
याआधी रुरकीच्या महशर आफ्रिदी यांनीही बहारदार शेर पेश केले. त्यांच्या ‘वो चाहते हैं के हिंदोस्ताँ छोड दे हम, बताओ भूत के डरसे मकाँ छोड दे हम?’ असा सवाल करणाऱ्या शेरने मोठी दाद वसूल केली. डाॅ. नदीम शाद यांनी सकारात्मक विचारांची पेरणी करणारे शेर सादर करत वाहवा मिळवली. 

‘सबब तलाश करो अपने हार जाने का, किसी की जीत पे रोने से कुछ नही होगा’ आणि ‘अगर है ख्वाब की ख्वाहीश तो जागना सीखो, यूँ आँखे मूँद के सोने से कुछ नही होगा’ या ओळींनी माहौलच बदलून टाकला. अकोल्याच्या नईम फराज यांनी ‘जिन्होने बाप को लडते सदा गुर्बत से देखा हो, वो बच्चे तो खिलौनों की फरमाईश नही करते’ हा व असे काही अशआर सादर केले. 

तर खांडव्याच्या सुफियान काझी यांनी ‘दिखाते है गरिबों पर बडा एहसान करते है, खबर अखबार में छपती है वो दान करते हैं’ असे भाष्य करत आजच्या कथित दानशूरांचे वर्णनही केले. आजच्या या मुशायऱ्यात टिपिकल जगतियानी, खान शमीम, शाइस्ता जमाल यांनीही आपल्या रचना सादर केल्या, तर अबरार काशीफ यांनी मुशायऱ्याचे सूत्रसंचालन केले. 
 
बातम्या आणखी आहेत...