आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shantigeeri Maharaj News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडिया नको, भारत म्हणा, शांतीगिरी महाराज यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - आता इंडिया नको, भारताला भारतच म्हणा. एवढेच काय, तर यापुढे इंग्रजी प्रतिज्ञेतदेखील भारत इज मय कंट्री असे म्हणावे, असे मत महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी व्यक्त केले. जनार्दन स्वामी यांच्या २५ व्या पुण्यस्मरणार्थ व १०० व्या जन्मशताब्दीनिमित्त वेरुळ येथे आयोजित होणा-या विश्वशांती धर्मसंस्कार सोहळ्याचे ध्वजारोहण शनिवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. २५ दिवस चालणा-या या सोहळ्यात अखंड नंदादीप, २५ कुंडात्मक महायज्ञ, ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव, कथा महोत्सव, साईचरित्र पारायण व गाथा पारायण होणार आहे. शनिवारपासून सोहळ्यास सुरुवात झाली.