आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठिंब्यावर बाबाजी आज गुपित फोडणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ - औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज (बाबाजी) बुधवारी भूमिका स्पष्ट करणार आहेत. काँग्रेसचे नितीन पाटील यांना बाबाजींनी पाठिंबा दिल्याचे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाले. त्यावरून बाबाजींसह त्यांच्या भक्त परिवारातही संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे या मुद्दय़ावर बुधवारी बैठक होणार असून, त्यात याचा निर्णय होईल, असे जनार्दन स्वामी आर्शमाचे प्रवक्ते राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. औरंगाबादेत सोमवारी झालेल्या बैठकीत केवळ पाठिंब्याबाबत चर्चाच झाली, असे ते म्हणाले.