आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा सांगतील त्या उमेदवारास विजयी करू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ - गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून दीड लाख मते घेणारे स्वामी शांतीगिरीजी महाराज यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात रविवारी आश्रमातर्फे जय बाबाजी भक्त परिवारातील औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हासेवक, तालुकासेवक, भागसेवकांची वेरूळ येथे तातडीची बैठक घेण्यात आली. ज्या उमेदवारास बाबा पाठिंबा दर्शवतील, त्याला विजयी करण्यासाठी 100 टक्के प्रयत्न केले जातील, अशी भूमिका समर्थकांनी स्पष्ट केली. या बैठकीस जनार्दन स्वामी ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. कृष्णा पाटील ठोंबरे, गणेश बोराडे, शिवा अंगुलगावकर, झुंबरशेठ मोकडे, राजेंद्र पवार, जिल्हासेवक जनार्दन अधाने, जनार्दन रिठे, शेकनाथ होळकर उपस्थित होते.

इच्छुकांच्या भेटी
रविवारी बाबाजी आश्रमातच असल्याचे कळताच आम आदमी पक्षातून बाहेर पडलेले व औरंगाबाद परिवर्तन आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील सराटे तसेच अ‍ॅड. लक्ष्मण प्रधान, मीर एहतेशाम अली यांनी बाबाजींची भेट घेतली. येत्या 4 एप्रिल रोजी होणार्‍या अण्णा हजारे यांच्या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण या वेळी बाबाजींना देण्यात आले, तर काँग्रेसकडून इच्छुक असलेले उमेदवार जे. के. जाधव यांनीही बाबाजींचे दर्शन घेतले.

राजभेटीविषयी संभ्रम नको
नुकतीच शांतीगिरीजी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली होती. ही बैठक नियोजित कामांसाठी होती. मनसे पदाधिकारी येथे का आले नाही, असा संभ्रम कोणी करून घेऊ नये. - विष्णू महाराज, प्रवक्ते, आश्रम.

धर्मसत्तेला पाठिंबा
सर्वांनी धर्मसत्ता व राजसत्ता समजून घेऊन योग्य उमेदवारास 100 टक्के मतदान करणे गरजेचे आहे. - शांतीगिरीजी महाराज