आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shantigiri Maharaj News In Marathi, Lok Sabha Election, Aurangabad, Khaire

दोन उमेदवारांचा दावा, पण शांतीगिरी महाराजांची मते पडणार कोणाच्या पारड्यात?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभा निवडणूक 2009 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या शांतीगिरी महाराजांनी यंदा कोणत्याही उमेदवारास पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे काहीशी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. मागील निवडणुकीत बाबांनी 1 लाख 48 हजारांवर मते घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या वेळी बाबांनी घेतलेली मते या वेळी नेमकी कुणाच्या पारड्यात पडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


2009 च्या निवडणुकीत शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. बाबांनी तिसर्‍या क्रमांकाची मते घेतली होती. काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते त्या वेळी बाबांच्या दिमतीला होते. तरीही निवडणुकीचे चित्र पालटू शकले नाही. बाबांनी नेमकी कुणाची मते खाल्ली यावर अनेक दिवस खल सुरू होता. या निवडणुकीत बाबा उभे नसल्याने बाबांची मते कुणाच्या पारड्यात पडतात यासंबंधी मात्र सर्वत्र उत्सुकता आहे.


गड आला पण सिंह गेला.
लोकसभेच्या 2009 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराने 32,629 इतकी मते घेतली होती. शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना सर्वाधिक मतदान कन्नड विधानसभा मतदारसंघात 55,357 इतके मिळाले होते. उपरोक्त मतदारसंघातील शिवसेनेचे तत्कालीन आमदार नामदेव पवार आता काँग्रेसमध्ये गेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कन्नड मतदारसंघाचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेसोबत आहेत. शिवसेना उमेदवार खैरे यांना सर्वात कमी मतदान 34,758 इतके वैजापूर विधानसभा क्षेत्रात मिळाले होते.


ही मंडळी होती बाबांच्या सोबत
रामकृष्णबाबा, अशोक पाटील डोणगावकर, राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब पाटील चिकटगावकर बाबांच्या बाजूने उभी होती.
2009 मध्ये अशी झाली लढत :
0 कन्नड विधानसभा : एकूण मतदान : 2,52,653, झालेले मतदान : 1,30,451, उत्तमसिंह पवार (काँग्रेस ) : 33,210, चंद्रकांत खैरे (शिवसेना) : 55,357, शांतीगिरी महाराज : 20882
0 गंगापूर विधानसभा: एकूण मतदान 233584, झालेले-125315, उत्तमसिंह पवार-31802, चंद्रकांत खैरे -35058, शांतीगिरी महाराज-40769
0 वैजापूर विधानसभा : एकूण मतदान 241524, झालेले-142315, पवार-21045, शिवसेना-34758, शांतीगिरी महाराज-66490
0 औरंगाबाद पूर्व : एकूण मतदान: 226140, झालेले -104017, उत्तमसिंह पवार-46005, चंद्रकांत खैरे 39186, महाराज-5381.
0 औरंगाबाद पश्चिम : एकूण मतदान-228324, झालेले-112898, पवार-41355, चंद्रकांत खैरे-46715, शांतीगिरी महाराज- 8369
0 औरंगाबाद मध्य : एकूण मतदान-239734, झालेले-115700, पवार-49430, चंद्रकांत खैरे-44464, शांतीगिरी महाराज-6127.


शांतीगिरी महाराजांना या मतदारसंघात मिळालेली मते
कन्नड 20882
गंगापूर 40769
वैजापूर 66,490