आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shantigiri Maharaj News In Marathi, Raj Thackeray, Election

शांतीगिरी महाराज राज ठाकरेंच्या भेटीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ/मुंबई - श्री श्री1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी रात्री मुंबईत भेट घेतली. ‘कृष्णकुंज’वर दोघांनी चर्चा केली. निवडणुकीत कोणत्या उमेदवारास पाठिंबा द्यायचा, हा चर्चेचा प्रमुख विषय होता, असे सूत्रांकडून समजते.


राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौर्‍याच्या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बाबाजींची भेट घेऊन त्यांना मुंबई भेटीचे निमंत्रण दिले होते. दरम्यान, शनिवारी ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. 2009 मध्ये महाराजांनी औरंगाबादेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सुमारे दीड लाख मते घेतली होती. या वेळी ते प्रत्यक्ष निवडणुकीत उतरणार नसले तरी योग्य उमेदवारास पाठिंबा देणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.