आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवभक्तीसह देशसेवेचीही गरज : शांतीगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - प्रत्येक मानव जीवनात मुला-बाळांसाठी काही गोष्टींचा संग्रह करत असून भारतीय संस्कृती सोडून पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करत आहे. असे न करता प्रत्येकाने पाल्यांवर योग्य संस्कार करत मनामध्ये देशप्रेम व देशनिष्ठा वाढवावी. केवळ देवभक्ती न करता देशभक्तीही करावी, असे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी केले.
वेरूळ येथे आयोजित अक्षय्य तृतीया धर्मसंस्कार सोहळ्याच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. आठ दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये अनुष्ठान, जपसह रुद्र स्वाहाकार यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते, तर समारोपाआधी निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवालय तीर्थावर जनार्दन स्वामींच्या पादुकांचे पूजन केले.