आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना, बीडसह पाच जिल्ह्यांत कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू : शरद पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - दुष्काळामुळे सर्वच शेतकरी अडचणीत आले आहेत. परंतु मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या पाच जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे, त्यामुळे सरकारने किमान या पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तरी कर्जमाफी द्यावी, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली. ते जालना जिल्ह्यातील समर्थ कारखाना येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवार म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर त्यांना नव्याने कर्ज मिळणार नाही, त्यामुळे खरिपाची पेरणी कशी करायची हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यात जवळपास ७० टक्के मोसंबी जळाली आहे, त्यामुळे या बागा पुनरुज्जीवित करण्यासाठी शासनाने तातडीने मदत द्यावी. ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी एक वर्ष मागे जातो. मात्र फळबागा जळाल्या तर शेतकरी सात वर्षे मागे जातो. याच मागणीसाठी आम्ही दिल्लीत सरकारशी भांडणार आहोत. सरकारने मदत दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा पवार यांनी दिला.

मराठवाड्यातील शेतकरी सोशिक आहेत. त्यामुळे त्यांना काही मिळत नाही. मात्र आता येथील शेतकऱ्यांनी गप्प न बसता सरकारविरोधी संघर्ष करण्यासाठी उभे राहिले पाहिजे, असे पवार म्हणाले.

त्यांना टीका करू द्या
मागील सरकारच्या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे, असे वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, कुणाला टीका करायची असेल तर करू द्या, मला शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायचे आहे.
बातम्या आणखी आहेत...