आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद दौऱ्यात NCP नेते शरद पवार म्हणाले- शेतकरी जगला तरच संपूर्ण देश जगेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव/औरंगाबाद - देशातील शेतकरी जगला तर संपूर्ण देश जगेल ,त्यासाठी वरून राजाची गरज आहे. यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिल्याने लाखोंचा पोशिंदा असलेला शेतकरी जिवंत राहील असे १५ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वाटत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

पळसखेडा येथील निसर्गकवी नामदेव महानोर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त (अमृत महोत्सवी ) आयोजित आनंद मेळाव्यात अध्यक्षस्थानी पदावरून शरद पवार यांनी बोलताना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पळसखेडा सोएगाव तालुक्यावर वरून राजा दिलखुलास बरसला असल्याने पिके डोलदार असल्याचे सांगितले. हि पिके सरकारच्या भरवशावर नव्हे तर शेतकऱ्यांच्या मनगटाच्या जोरावर वाढली आहेत असे ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर आमदार सतीश पाटील, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर,अशोक जैन,मधुकर भावे,आदींची विशेस उपस्थिती होती. यावेळी शरद पवारांच्या हस्ते विधी मंडळातून ना.धो, महानोर या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.तसेच कवी महानोर पत्नी सुलोचनाबाई यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ना. धो. महानोर यांनी आपण पवार यांचे बोट धरून विधी मंडळात दोन वेळा आमदार राहिलो. या काळात मी पाणी अडवा पाणी जिरवा,शेती विषयक , अनेक प्रस्ताव मांडले होते ते शरद पवार मुख्यमंत्री असल्याने मंजूर करण्यात आले होत असे महानोर यांनी सत्कारानंतर सांगितले.या वेळी शरद पवार यांनी शेती तसेच शेतीविषयक विषयांवर मार्गदर्शन केले. दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. या वेळी कार्यक्रमात महानोर भाऊक होत पवारांच्या आठवणी सांगितल्या.
बातम्या आणखी आहेत...