आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर शरद पवार ठरू शकतात डी. लिट. घेणारे आठवे राजकारणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -  डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्थापनेपासून ते अात्तापर्यंत १६ जणांचा डी.लिट., एलएलडी अन् डीएस्सी या मानद पदवी देऊन सन्मान केला अाहे. त्यात ७ राजकीय नेते असून माजी कृषिमंत्री शरद पवार यांचाही त्यात समावेश होण्याची शक्यता आहे. कुलगुरू डाॅ. बी. ए. चोपडे यांनी पदवी स्वीकारण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला अाहे.
२३ अाॅगस्ट १९५८ रोजी विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासूनच्या गेल्या ५९ वर्षांमध्ये तीन जणांना एलएलडी अर्थात डाॅक्टर अाॅफ लाॅ तर एकाला डीएस्सी म्हणजेच डाॅक्टरेट अाॅफ सायन्स अशी मानद पदवी देण्यात आली.
 
त्याची सुरुवात तत्कालीन कुलगुरू डाॅ. अार. पी. नाथ यांनी केली. यशवंतराव चव्हाणांचे विद्यापीठ स्थापनेतील योगदान लक्षात घेऊन त्यांना सर्वप्रथम १९७१  मध्ये एलएलडी मानद पदवी दिली गेली. १९७०, १९७२ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राॅफ यांना तर १९७३ मध्ये डाॅ. के. एन. सेठना यांनाही डॉ. नाथ यांनीच पहिली अाणि अखेरची डी.एस्सी. पदवी दिली.
 
 
पवारांना मराठवाड्यातील दोन विद्यापीठांची डी.लिट.
शरद पवार यांना नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा, परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने डी. लिट. दिली अाहे. मुख्यमंत्री असताना पवारांनीच १४ जानेवारी १९९४ रोजी विद्यापीठ  अंमलबजावणी केली. त्यामुळे डाॅ. चोपडेंनी त्यांना डी.लिट. स्वीकारण्याची गळ घातली. शिवाय १४ जानेवारी २०१८ रोजी नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्ष सोहळ्यास त्यांना पाहुणे करण्याचेही ठरवले अाहे.
 
 
 
बातम्या आणखी आहेत...