आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम समाजालाही आरक्षण हवे : शरद पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशातील मुस्लिमांची अवस्था ही आदिवासी व दलितांसारखीच आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी औरंगाबादेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीत ते म्हणाले, देशाच्या विकासात मुस्लिमांचाही सहभाग आहे. मागास समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्यासाठी आरक्षण दिले जाते. आदिवासी आणि दलितांना हे आरक्षण दिले गेले आहे. मुस्लिम समाजाचीही आर्थिक व सामाजिक परिस्थिती त्यांच्यासारखीच आहे. त्यामुळे या समाजालाही आरक्षण मिळावे.

हा देश कोणाच्या बापाचा नाही :
पक्षाचे नेते गफार मलिक म्हणाले की, काही लोकांकडून ‘मुस्लिममुक्त भारत’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर पवार बोलले, ‘यावर मला जेव्हा विचारणा करण्यात अाली तेव्हाच मी म्हणालो होतो, असे म्हणणाऱ्यांना पागलखान्यात पाठवले पाहिजे.’ हा देश कोणाच्या बापाचा नाही. येथे सर्वधर्मीय समान हक्काने राहतात. ‘मुस्लिममुक्त भारत’ म्हणणाऱ्या लोकांपासूनच देशाला मुक्ती हवी आहे.
बातम्या आणखी आहेत...