आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Drought Meeting Ministers, MP's Absent

सत्ताधा-यांत कुरघोडीचे राजकारण; बैठकीपासून मंत्री, आमदार, खासदार राहिले दूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दुष्काळाचे राजकारण करू नका, असा सल्ला शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देत असले तरी प्रत्यक्षात दुष्काळावरून या दोन्ही पक्षांत शह-प्रतिशहाचे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. शरद पवारांचा दोन दिवसांचा दौरा पूर्ण होण्याच्या आत अधिका-यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेत मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल पुढे असल्याचे दाखवून दिले, तर प्रत्यक्ष त्या भागात दौरा करून मराठवाड्याच्या मुख्यालयात काँग्रेसचे मंत्री, नेत्यांना टाळत आढावा बैठक घेऊन राष्‍ट्र वादीने आपण पुढे असल्याचे दाखवून दिले.
दुष्काळ निवारणार्थ दोन समित्यांच्या अध्यक्षपदी केंद्रीय कृषिमंत्री पवार आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पवारांकडे धाव घ्यावी लागणार आहे. त्याचाच फायदा घेत राष्‍ट्र वादीचे नेते काँग्रेसची कोंडी करण्याची संधी सोडायला तयार नाहीत. रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मराठवाड्यातील अधिका-या ंची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन परिस्थिती जाणून घेतली, महत्त्वाच्या सूचनाही केल्या पवार यांनी औरंगाबाद, जालना दौ-या त दुष्काळी परिस्थिती जाणून घेताना लोकप्रतिनिधींशी चर्चाही केली; पण यात खासदार रजनीताई पाटील वगळता काँग्रेसचे मंत्री आणि नेते दूरच राहिले. मराठवाड्यातील खासदारांपैकी चौघेच पवार यांना भेटले. त्यात औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, उस्मानाबादचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, राज्यसभा सदस्य रजनीताई पाटील यांचा समावेश होता.

दुष्काळ निवारणासाठी एकत्र या
दुष्काळाची ‘फर्स्ट हँड’ माहिती घेण्यासाठी आपण आलो आहोत. राज्याने योग्य ते प्रस्ताव सादर केल्यास तातडीने मदत दिली जाईल. दुष्काळाचे राजकारण न करता सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.
शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री