आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोलाचा सल्ला, रुग्णांची लुबाडणूक करू नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉक्टरांनी रुग्णांवर सुरक्षित, अचूक आर्थिक दृष्टीने परवडणारे उपचार करावेत. गरज नसलेल्या तपासण्या अतिरिक्त औषधोपचार करायला लावू नका. दुर्दैवाने सध्या अनेक डॉक्टर अनैतिक मार्ग अवलंबतात. तुम्हाला समाजात प्रतिष्ठा नाव कमवायचे असेल तर अशा गैरप्रकारांपासून दूर राहा, रुग्णांची लुबाडणूक करू नका, असा कळकळीचा आवाहनवजा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी डॉक्टरांना दिला.
एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस या अभिमत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी पवारांच्या उपस्थितीत पार पडला. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यात पवार यांनी स्वत: आयुष्यातील सहावी ‘डॉक्टरेट’ मानद उपाधी घेऊन केलेले दीक्षांत भाषण त्यांच्याच शब्दांत...
कोणताही व्यवसाय वैद्यकीय व्यवसायापेक्षा उदात्त नाही. तुमच्याकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा असून त्या पूर्ण करण्याचा निश्चय केला पाहिजे. रुग्णांचा विश्वास ढळेल, असे काही करू नका. पीडित रुग्णांची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे? वेळात वेळ काढून त्यांच्या प्रकृतीची सहानुभूतीपूर्वक तपासणी करावी अशी रुग्णांची इच्छा असते. सुरक्षित, अचूक आर्थिक दृष्टीने परवडणारे उपचार करावेत. त्यांना गरज नसलेल्या तपासण्या अतिरिक्त औषधोपचार करायला लावू नका. दुर्दैवाने सध्या अनेक डॉक्टर अनैतिक मार्ग अवलंबतात. तुम्हाला समाजात प्रतिष्ठा नाव कमवायचे असेल तर अशा गैरप्रकारापासून दूर राहा.
अंगी शहाणपणा बाळगा, शहाणपणामुळेच सामान्य डॉक्टर उत्कृष्ट डॉक्टर यांच्यातील फरक अनुभवयास येतो. तुमचे उत्कृष्ट ज्ञान भरपूर अनुभव असूनसुद्धा शहाणपण नसेल तर तुम्ही उत्कृष्टता प्राप्त करू शकत नाही. कुणाचेही नुकसान होऊ नये याची काळजी घ्या. रुग्णालयांच्या यादीत काही नवे येतीलही पण कमी खर्चात श्रेष्ठ उपचार भारतात मिळत असल्यामुळे परदेशी रुग्ण मोठ्या संख्येने भारतात येत आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत वैद्यकीय पर्यटन गतीने वाढणार आहे. मला खात्री आहे की, देशाच्या वैद्यकीय पर्यटनापासून महसूल गौरव प्राप्त करून देण्यास तुमच्यापैकी अनेकांचा सहभाग असेल.
आधी व्यसने सोडा : तंबाखू धूम्रपान मद्यपानाची सवय असेल तर त्वरित सोडून द्यावी. कारण आपण रुग्णांना व्यसने सोडायला सांगत असू तर स्वत: आधी सोडायली हवी. डॉक्टर शहरातच वैद्यकीय सेवेचा आग्रह धरतात. त्यामुळे गावकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त होते. तरुण डॉक्टरांच्या मानसिकतेत बदल झाला नाही, तर ग्रामीण भागात कितीही चांगली वैद्यकीय सेवा देण्याचे धोरण सरकारने अवलंबले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे स्वत:च दोन वर्ष गावकऱ्यांची सेवा करण्याचे बंधन लादून घ्यावे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते डॉक्टरांची संख्या हजार लोकसंख्येच्या मागे डॉक्टर अशी असावी, मात्र भारतात हे प्रमाण सतराशेच्या जवळपास आहे. त्यामुळे हा व्यवसाय सामाजिक सेवेसाठी आहे, याचे भान ठेवावे किंबहुना तुम्ही तशी आता शपथ घेतलेलीच आहे. जयहिंद...जय महाराष्ट्र
५६४ एकूण पदव्या
२ सुपर स्पेशालिटी पदवी
१२४ एम. डी. आणि एम. एस.
२३१ उर्वरित पदव्या
५ पीएच.डी.
२०४ एमबीबीएस
व्यासपीठावरील मान्यवर
एमजीएमचे संस्थापक अध्यक्ष कमलकिशोर कदम, कुलपती डॉ. के. जी. नारायणखेडकर, कुलगुरू डॉ. सुधीर कदम, (प्र) कुलगुरू डॉ. एस. के. कौल, कुलसचिव डॉ. झेड. जी. बदडे, परीक्षा नियंत्रक डॉ. एन. एन. कदम, सहपरीक्षा नियंत्रक डॉ. एन. सी. मोहंती, अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ, अधिष्ठाता डॉ. जी. एस. नरशेट्टी, डॉ. पी. एन. जाधव, अंकुशराव उपाख्य बाबूराव कदम आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. सुधीर कदम यांनी केले. कमलकिशोर कदम यांनी पवार यांच्या जीवनकार्यावर संवेदनशील भाषण केले. कार्यक्रमपत्रिकेतील नियोजित वेळेपेक्षा दीक्षांत समारंभ आधीच संपला.
बातम्या आणखी आहेत...