आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी धुतले डाग, मग मांडले विकासाचे मुद्दे, कामांची उजळणी करणे ही पवारांची अपरिहार्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-आघाडीला मागे सारत लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. विधानसभेच्या रणधुमाळीत तर बिघाडीच झाली. त्यामुळे विरोधी पक्षांसह स्वकीयांसोबतही संघर्ष करण्याची तारेवरची कसरत सध्या राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार करताना दिसत आहेत. अजित पवारांमुळे पक्षावर 'भ्रष्टवादी' असल्याचा आरोप भाजप, शिवसेनेसहित काँग्रेसने केला. म्हणून आधी भ्रष्टाचाराचे ह्यडागह्ण धुऊन सभांमधून राष्ट्रवादीच्या चांगल्या कामांची उजळणी करायची ही आता शरद पवारांची रणनीतीवजा अपरिहार्यता बनली आहे. नुकत्याच झालेल्या कन्नडच्या सभेत त्यांचा तसाच सूर दिसून आला.
ह्लसिंचन विभागात 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गवगवा केला जातो. प्रत्यक्षात धरणं, लघु प्रकल्प, उपसा जलसिंचन आणि कालवे उभारण्याची एकूण तरतूद आहे ती..! शिवाय धरणांना आधी विरोध होतो, मग उभारण्यात दिरंगाई होते. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढते. देशात सर्वात मोठे नर्मदा धरण गुजरातमध्ये होत असून त्याची किंमत 6 हजार कोटींवरून 36 हजार कोटींवर गेली. त्याची मात्र ओरड होत नाही. महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होतो, हे चुकीचे आहे...!ह्व कन्नडचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या सभेतील पवार यांचे हे उदगार ह्यडागह्ण धुऊन काढण्याचा प्रयत्न करणारे आहेत. पक्षाने कधीही भ्रष्टाचार केला नाही असा सूर आळवत, केलाच असेल तर विकासच केल्याचे त्यांनी मतदारांना पटवून सांगितले. शेतकरी, श्रमिक, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिलांसाठी राष्ट्रवादीमुळे विविध योजना आल्या आहेत. महिला आता सरपंच, सभापती, जि.प. अध्यक्ष, मनपामध्येही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जात आहे, महिलांसह सर्वच क्षेत्रांतील प्रगतीत राष्ट्रवादीचाच पुढाकार असल्याचे त्यांनी ठोसपणे सांगितले. एससी, एसटी, ओबीसींप्रमाणे आम्ही मराठा आणि मुस्लिमांनाही आरक्षण दिले. शिवाय पुढच्या पिढीचा विचार करणारा पक्ष फक्त राष्ट्रवादीच आहे. सभेत पवार यांनी कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचे टाळले. नरेंद्र मोदी यांचा मात्र त्यांनी सहा वेळा ह्यमोदी साहेबह्ण असा उल्लेख केला. त्याच वेळी 125 दिवसांत मोदींचे 'अच्छे दिन' लोकांना कळून चुकले, म्हणून यूपीच्या पोटनिवडणुकांत भाजपची पीछेहाट झाल्याचे त्यांनी म्हटले.

गर्दी कमी, निरुत्साह आणि हिरमोडही
सभेला अपेक्षेप्रमाणे गर्दी नव्हती. त्यांच्या भाषणातील काही उच्चार लोकांना कळत नसल्यामुळे अर्ध्या भाषणानंतर लोकांनी सभा सुरू असतानाच निघून जाणे पसंत केले. लोकांनी त्यांच्या भाषणाला प्रतिसादही कमीच दिला. टाळ्यांची वानवा जाणवली. हिरमोड, उत्साहाचा अभाव दिसून येत होता. भाषण सुरू झाल्यानंतर वाजवण्यात येणाऱ्या तुताऱ्यांचाही आवाज निघू शकला नाही. तरुणांची विरळ गर्दी, शेतकरी-शेतमजुरांची उपस्थिती लक्षणीय होती.