आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येमेनच्या युद्धभूमीचा अडथळा पार करत ‘ती’ औरंगाबादेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिक्षणाच्या ओढीने येमेनची एक विद्यार्थिनी कठीण प्रसंगांचा सामना करत तब्बल १७ महिन्यांनंतर विद्यापीठात परतली. एरवी सहा तासांत विमानाने मुंबईत पोहोचता येते. मात्र, बबली समुद्र, विमान आणि बसने तब्बल दिवस प्रवास करत एकट्याच औरंगाबादेत आल्या. उच्च शिक्षणासाठीची त्यांची ओढ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले, तर जुन्या मित्रांची भेट घेऊन बबली भावुक झाल्या.

फैजा अल बबली येमेनहून भारतात एमएस्सीसाठी आल्या आहेत. येमेनमध्ये विद्युत निर्मिती केंद्रातील पर्यावरण विभागात त्या काम करतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात बबली यांनी फर्स्ट क्लासमध्ये एमएस्सी प्रथम वर्ष पूर्ण केले. उन्हाळ्याच्या सुट्यांत त्या येमेनला गेल्या. मात्र, तेथे युद्ध उफाळून आले. परिस्थिती एवढी वाईट झाली की बाहेरील देशांनी येमेनमधील दूतावास बंद केले. विमानसेवाही ठप्प झाली. फैजा राहते त्या आमरान शहरात शांतता असली तरी प्रवासाचे सर्व मार्ग बंद झाल्याने त्यांना भारतात परतणे अशक्य झाले. मात्र, त्या वर्षभर इथल्या वर्गमित्रांशी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ईमेलद्वारे संपर्कात होत्या. विभागप्रमुख डॉ. एन. एन. बंदेला यांनाही वेळोवेळी तिथल्या परिस्थितीची माहिती देत होत्या.

सहा तासांचा प्रवास दिवसांत : फैजा यांनी भारतात परतण्यासाठी वेगळा मार्ग शोधला. आमरानहून ५० किलोमीटरवर असणारी येमेनची राजधानी सना बसने गाठली. येथून एका खासगी वाहनाने राजधानी इडनवर पोहोचल्या. तेथून २४ तास समुद्रात जहाजाने प्रवास करत ज्युबिती शहर गाठले. तेथे कागदपत्रे जमा करून व्हिसा मिळवण्यात दिवस गेले. तेथून भारताला विमान नसल्याने आधी दुबई मग तेथून विमानाने मुंबई गाठली आणि बसने औरंगाबादला पोहोचल्या. येमेनपासून थेट विमानाने मुंबई गाठायला तास लागतात; पण बबली यांना यासाठी दिवस खर्च करावे लागले. प्रवासासाठी सुमारे लाख रुपये खर्च आला.

मी केलेला सर्वकाही प्रवास केवळ शिक्षणासाठीच!
फैजाअल बबली यांना एमएस्सी, पीएचडी करून विद्यापीठात अध्यापन करायचे आहे. आता पुन्हा नवीन बॅचबाबत मनात थोडी भीती होती. ती आठवडाभरातच दूर झाली आहे. २९ ऑगस्टला त्या शहरात आल्या आणि लगेच दुसऱ्या दिवशी क्लास टेस्टला बसल्या, तर फैजाला भेटण्यासाठी त्यांचे क्लासमेट खास विद्यापीठात पोहोचले. प्रा. महादेव मुळे, प्रा. बलभीम चव्हाण, प्रा. योगिता पद्मे-देशमाने सर्वांनीच बबलीचे विभागात स्वागत केले.

शिक्षणाची ओढ...
एमएस्सीच्या पहिल्या वर्षात वर्गमित्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनीच खूप सहकार्य केले. मला माझ्या घरी असल्यासारखेच वाटत होते. येथून परतल्यावरही प्रत्येक जण संपर्कात होता. यामुळेच पुन्हा येथे यावे वाटले. येमेनची परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशीच आमची अपेक्षा आहे. - फैजाअल बबली, विद्यार्थी.
बातम्या आणखी आहेत...