आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shekhar Magar Analysis On BSP And RPI In Aurangabad Election

विश्लेषण - बसपाची मुसंडी, रिपाइंने पत गमावली !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बहुजन समाज पार्टीने (बसपा) जोरदार मुसंडी मारली. २००५ मध्ये संजयनगर येथील सरिता अशोक ससाणे यांचा अपवाद वगळता बसपाला शहरात पाय रोवता आले नाही. पाच विजयी उमेदवारांमध्ये चार महिला असून दोन ओबीसी उमेदवारांनी बाजी मारली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइं) ढीगभर पक्ष आणि तथाकथित नेत्यांच्या लाचारीला कंटाळलेल्या आंबेडकर अनुयायांचा हा कौल एका अर्थाने नेत्यांना इशारा वजा आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारा ठरला आहे.

रामदास आठवले यांचा रिपाइं, प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पीरिपा, अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचा भारिप-बहुजन महासंघ, शिवाय रिपाइं गवई गट आदींसह अन्य लहान-मोठ्या गटांनी यंदाच्या निवडणुकीत गटांगळ्या खाल्या आहेत. पायलीचे पन्नास पक्ष अन् नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीला यापुढे आंबेडकरी जनता कदापि सहन करणार नाही, असेच या निकालाने स्पष्ट केले आहे. बसपाचे केंद्रीय महासचिव डॉ. सुरेश माने यांच्या ‘टीम’ने नेमकी हीच गोष्ट हेरली आणि रणनीती आखून निवडणूक लढवली.