आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shekhar Magar Article About Crime, Divya Marathi

इझी मनीचे वेड अन् वाढती गुन्हेगारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दशकांपूर्वी गुन्हेगारांच्या टोळ्या या निरक्षर आणि आर्थिक विवंचनेशी सामना करणा-या होत्या. ग्रामीण भागात अथवा गावाच्या बाहेर निर्जनस्थळी त्यांचे वास्तव्य असायचे. आता मात्र प्रगत समाजात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. निरक्षर नव्हे सुशिक्षित आणि आर्थिक विवंचनेला पर्याय म्हणून नव्हे तर ब-यापैकी श्रीमंती असणारेही आता गुन्हेगारीकडे वळाले आहेत. त्यामध्ये सायबर क्राइम, चेन स्नॅचिंग, ऑनलाइन फसवणूक, चो-या, घरफोड्या आदींसारख्या गुन्ह्यांमध्येही सुशिक्षित समाजातील युवकांच्या समावेशाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

औरंगाबादेत एका महिलेचे मंगळसूत्र लांबवणारा जेव्हा पोलिसांनी गजाआड केला. त्या वेळी सर्वांचे डोळे विस्फारले होते. कारण चोरटा एका वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असल्याचे स्पष्ट झाले. समाजाला बुद्धिवंत, ज्ञानी करणा-या, दिशा देणा-या प्राध्यापकाने महिलेच्या सौभाग्याच्या लेण्यावर हात टाकण्याला आपण काय म्हणणार? मंगळसूत्र चोरट्यांच्या जेव्हा जेव्हा पोलिसांनी मुसक्या आवळल्या, त्या त्या वेळी समाजाला आत्मशोध करण्यास भाग पाडले आहे. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे, आता निरक्षर किंवा आर्थिक विवंचनेतूनच असे प्रकार होत असल्याचे आपल्याला अमान्य करावे लागेल. सिनेमामध्ये धूमस्टाइल बाइक चालवणारा नायक अथवा खलनायक, गुन्ह्यांना सिनेमामध्ये दिलेल्या राजाश्रयामुळे प्रगल्भ समाजातील तरुण गुन्ह्यासाठी अनुकरण करत आहेत. पदवी, पदव्युत्तर पदवी, इंजिनिअर, एमबीए झालेले तरुणही आता गुन्ह्याच्या क्षेत्रात मागे नाहीत.
झटपट श्रीमंत होण्यासाठी वा ‘इझी मनी’चा ट्रेंड तरुण पिढीत वाढतो आहे.
इझी मनीसाठी नकळत कायदा मोडणे आणि जाणीवपूर्वक कायदा मोडणे यामध्ये अधिक प्रमाण जाणीवपूर्वक गुन्हे करणा-यांचेच आहे. सुशिक्षित समाजाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.