आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंद्रा डीएमआयसीचे प्लाॅट वाटप ऑक्टोबर महिन्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेंद्रा डीएमआयसीचे प्लाॅट वाटप ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असून, त्याच्या जाहिराती लवकरच निघतील. देशी-विदेशी गुंतवणूकदारांना जागा दाखवण्यासाठी दिवाळीनंतर शहरात आणले जाईल. पायाभूत सुविधांचे काम डिसेंबर २०१७ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांनी दिली. सेठींसह ऑरिक सिटीचे सहसंचालक विक्रम कुमार, महाव्यवस्थापक गजानन पाटील यांनी शेंद्रा बिडकीन डीएमआयसीची पाहणी केली.
सेठी म्हणाले, शेंद्रा येथील रस्ते अाणि पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. हे काम डिसेंबर २०१७ मध्ये संपेल. मात्र, ऑक्टोबर २०१६ मध्ये म्हणजे दिवाळी झाल्यावर प्लॉट वाटप सुरू केले जाणार आहे. त्यासाठी नियोजनबद्ध मार्केटिंग करून गुंतवणूकदारांना प्रथम जागा दाखणार आहोत. त्यासाठी कोरिया, तैवान, जपानसह देशातील प्रमुख गुंतवणूकदारांसाठी जागेचा पाहणी दौरा दिवाळीनंतर आखणार आहोत. ऑरिक सिटीकडे प्रामुख्याने ऑटोपार्ट इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचा ओढा आहे. कोरिया, तैवान,जपानमध्ये सर्वाधिक याच कंपन्या आहेत, असेही सेठी यांनी सांगितले.

स्वतंत्र पाइपलाइन : पाण्याकरिताएमआयडीसी शेंद्र्यासाठी स्वंतत्र पाइपलाइन देणार आहे. सीएचटूएम ही सिंगापूरची कंपनी शहराच्या ११० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरायोग्य करून देणार आहे. शेंद्रा भागात झाडांचे व्हॅल्युएशनचे काम सध्या सुरू आहे. जमीन अधिग्रहणाच्या तक्रारींचा निपटारा आज केल्याचे सेठी यांनी सांगितले. आजवर एमआयडीसी रस्ते, वीज, पाणी याच पायाभूत सुविधांकडे लक्ष देत होते. आता घनकचरा व्यवस्थापन युटिलिटी सर्व्हिसेसची जबाबदारी घेण्याचा निर्णय बोर्ड मिटिंगमध्ये झाल्याचे सेठी यांनी सांगितले.

२७०० हेक्टर जागा ताब्यात
बिडकीन डीएमआयसीसाठी ३२०० हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाईल. त्यापैकी २७०० हेक्टरचे अधिग्रहण झाले आहे. उर्वरित जागा दोन महिन्यांत अधिग्रहित केली जाईल. आतापर्यंत ५०० हेक्टरचा मोबादला दिल्याची माहिती ऑरिक सिटीचे महाव्यवस्थापक गजानन पाटील यांनी दिली. शेंद्रा भागात डीएमआयसीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे (ऑरिक हॉल) टेंडर सप्टेंबरला निघाले असून, दिवाळीनंतर लगेच हे काम सुरू होईल, असेही पाटील यांंनी सांगितले.

स्थानिकांना जागा देऊ
स्थानिक उद्योजकांना डीएमआयसीत जागा मिळत नाही अशी ओरड होते. या प्रश्नावर सेठी म्हणाले, स्थानिक उद्योजकांना निश्चित जागा देऊ, विस्तारीकरणासाठीही जागा देऊ. विभागीय अधिकारी सोहम वायाळ, मुख्य अभियंता केदारे उपस्थित होते.

सामाजिक वातावरणामुळे बकाली
शेंद्रा भागात ३२ %,वाळूजभागात १९ %जमीनरिकामी आहे, पैठण, चिकलठाणा, रेल्वेल्टेशन एमआयडीसीतून उद्योग बाहेर गेले. तीच गत डीएमआयसीची होऊ शकते काय? या प्रश्नावर सेठी म्हणाले, औरंगाबादची सामाजिक परिस्थिती याला जबाबदार आहे. सीआयआयच्या प्रतिनिधींनीही हेच मत नोंदवले आहे.
बातम्या आणखी आहेत...