आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कामगार पक्षातर्फे विद्यापीठातील दुष्काळग्रस्तांना मोफत भोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नाशिकच्या बेजॉन देसाई फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १६५ दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत भोजन सुरू झाल्यानंतर आता शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार घेतला आहे. सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना मोफत भोजन देण्याचा प्रस्ताव त्यांनी विद्यापीठाला सादर केला आहे. शेकाप ६७ लाखांपर्यंत खर्च करण्यास तयार आहे. २८ जानेवारीपासून योजनेला सुरुवात होईल, मात्र १५ जानेवारीच्या बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दोन वेळचे मोफत जेवण देण्यासाठी विविध संस्था पुढे येत असून यासंदर्भातील वृत्त ‘दिव्य मराठी’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त बेजॉय देसाई फाउंडेशनने आधी १२५ विद्यार्थ्यांना मोफत भोजन देण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर विद्यार्थी कल्याण विभागात डिसेंबर रोजी ७०८ विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुलाखतीमुळे त्यांनी १६५ विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.
सर्व विद्यार्थ्यांचे मोफत भोजन १६ डिसेंबरपासून सुरूही झाले आहे. आता शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी काकासाहेब शिंदे आणि डॉ. उमाकांत राठोड यांनीही दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत भोजन देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी विद्यापीठाकडे नुकताच प्रस्ताव सादर केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी त्यासाठी खर्चाची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. १५ जानेवारीला या संदर्भात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे सविस्तर बैठक होण्याची शक्यता आहे. डॉ. राठोड, शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उल्हास उढाण आणि प्रा. मारुती तेगमपुरे यांचीही बैठकीला उपस्थिती राहणार आहे. पाचशे विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी दरमहा लाख २७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शैक्षणिक सत्र एप्रिलला संपणार असल्यामुळे पहिल्या टप्प्यात ही योजना एप्रिलपर्यंतच सुरू राहणार आहे. त्यानंतर नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जूनपासून पुन्हा मोफत भोजन देण्याची शेकापची तयारी आहे.
पक्षाने दर्शवली ६७ लाख रुपये खर्चाची तयारी
मुलींच्या दोन वेळच्या जेवणासाठी १०५० रुपये, तर मुलांसाठी १२५० रुपयांचा खर्च येतो. ५०० विद्यार्थ्यांसाठी दरमहा लाख २७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. शेकापला यासाठी ६७ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. कुलसचिव डॉ. महेंद्र शिरसाट यांच्या नेतृत्वात समिती गठित केल्याची माहिती आहे. डॉ. राठोड, उढाण, शिंद, मारुती तेगमपुरे यांचा यात समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...