आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड महापौरपदी शीला भवरे; उपमहापौर पाटील; भाजपनेही लढली निवडणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- नांदेड महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शीला भवरे यांची निवड झाली. भवरे यांना ७४ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या बेबीताई गुपिले यांना सहा मते मिळाली. महापालिकेतील ८१ नगरसेवकांपैकी काँग्रेसचे ७३ नगरसेवक आहेत, भाजपचे सहा तर शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली तर अपक्षाने आपले मत काँग्रेसच्या पारड्यात टाकले. महापौरपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही काँग्रेसचे विनय पाटील ७४ मते घेऊन विजयी झाले  तर त्यांचे प्रतिस्पर्धी गुरूप्रितकौर सोडी यांना सहा मते मिळाली.  

नांदेड महापालिकेत ८१ पैकी सर्वाधिक ७३ जागा जिंकून काँग्रेसने एकहाती वर्चस्व मिळवले आहे. भाजपला केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे काँग्रेसचेच महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित होते. असे असले तरी भाजपने दोन्ही जागांसाठी उमेदवार उभे केल्याने ही निवडणूक घ्यावी लागली. आज सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख हेही उपस्थित होते.
 
नांदेड महापालिकेत असे आहे पक्षीय बलाबल-
 
एकूण जागा - 81 
 
काँग्रेस - 73 
भाजपा - 06 
सेना - 01 
अपक्ष - 01 
 
पुढे स्लाई़डद्वारे पाहा, यासंबंधित माहिती...
बातम्या आणखी आहेत...