आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shirdi Santha's Ceo's Extenstion Challenge In Aurangabad Bench

शिर्डी संस्थान सीईओंच्या मुदतवाढीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -शिर्डी येथील श्री साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर मोरे आणि उपकार्यकारी अधिकारी यशवंत माने यांना मुदतवाढ देण्याच्या आदेशास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 11 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.

संजय काळे आणि संदीप कुलकर्णी यांनी खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, विधी व न्याय विभागाने उपजिल्हाधिकारी किशोर मोरे यांची 1 फेब्रुवारी 2009 पासून दोन वर्षांकरिता शिर्डी संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीला नंतर दोनवेळा मुदत वाढ देण्यात आली. नियमानुसार ही नियुक्ती जास्तीत जास्त चार वर्षापर्यंत करता येते. ही याचिका न्या. ए. एच. जोशी आणि न्या. एस. पी. देशमुख यांच्या न्यायालयासमोर सुनावणीसाठी आली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर, किरण नगरकर, तर शासनातर्फे सुनील कुरुंदकर काम पाहत आहेत.