आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिऊरची एक जागा गायब?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- ग्रामपंचायत निवडणुकीच्या ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतून शिऊर येथील प्रभागातील एक जागा चक्क गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १७ जागा असताना १६ जागा असल्याचे ऑनलाइन प्रक्रियेतून दिसून येत असल्यामुळे काही वेळी येथे संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
इच्छुक उमेदवारांनी तक्रार करताच तहसील विभागातील निवडणूक विभागाने तत्काळ हालचाली करून सॉफ्टवेअरमध्ये या जागेची नोंद करून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत चक्क एक जागाच गायब झाल्याचा प्रकार झाल्याने प्रशासन याबाबत किती गंभीर आहे हे समोर आले आहे.या ग्रामपंचायतीत सहा प्रभाग आहेत. प्रभाग १ मध्ये २ व इतर अन्य सर्व ठिकाणी प्रत्येकी तीन जागा आहेत.

नजरचुकीची कबुली
याबाबत नायब तहसीलदार सारिका शिंदे यांनी ही तांत्रिक चूक होती ती दुरुस्त केली आहे. नजरचुकीने हा प्रकार झाला आहे. आता या ग्रामपंचायतीत १७ जागा दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...