आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shisena MP Chandrakat Khaire News In Marathi, Namdev Pawar, Kannad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना संपवत आहेत; नामदेव पवार यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड- शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना संपवत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी आमदार व माजी जिल्हाप्रमुख नामदेवराव पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली. कन्नड तालुक्याच्या विकासासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. ज्या जाधव कुटुंबीयांविरुद्ध शिवसैनिकांनी संघर्ष केला, त्याच व्यक्तीला खैरे यांनी गरज नसताना शिवसेनेत प्रवेश दिला. मागील निवडणुकीत त्यांनी डॉ. अण्णा शिंदे यांना बंडखोरी करण्यास भाग पाडले. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेच्या उमेदवारास पंचवीस हजारांच्या वर मते मिळाली नाहीत; परंतु आपण हीच मते चाळीस हजारांच्या वर नेली, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आदींच्या उपस्थितीत पवार सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.