आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातानुकूलित डब्यांपेक्षा पॅसेंजर बरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - नांदेड ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या तपोवन एक्स्प्रेस रेल्वेगाडीमधील वातानुकूलित डब्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या गाडीची देखभाल दुरुस्ती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून होतच नसल्याचे चित्र आहे. वातानुकूलित डब्यांमध्ये आगीपासून संरक्षण करण्यासाठी असलेले फायर एक्स्टिंग्विशर विशिष्ट ठिकाणी ठेवले जात नाही. खुर्च्या तुटलेल्या आहेत. डस्टबिनची स्वच्छताही केली जात नाही. गाडीत पाण्याचा अभाव आहे. भरीस भर म्हणून आरक्षित डब्यांमधील गर्दी रोखण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसपेक्षा पॅसेंजर गाडी बरी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्या तुलनेत गाड्यांची संख्या अपुरी पडत आहे. परिणामी आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या गैरव्यवस्थेची झळ सर्वाधिक सहन करावी लागत आहे. रेल्वे प्रशासन गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे, सोयी-सुविधा पुरवणे गाड्यांची देखभाल दुरुस्ती करण्याकडे कायम दुर्लक्ष करीत आहे.
मुंबईसाठीचारच नियमित गाड्या :
आैरंगाबादहूनमनमाडमार्गे मुंबईकडे सहा रेल्वेगाड्या धावतात. यातील चार रेल्वेगाड्या नियमित आहेत. आैरंगाबाद-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस आैरंगाबादहून सकाळी वाजता निघते. या गाडीला मनमाडपर्यंत कुठेच थांबा नाही. त्यानंतर मुंबईसाठी दुपारी २.३० वाजता नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस आहे. नागपूर - मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस रात्री ९.३० वाजता सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस रात्री ११.२० वाजता आैरंगाबादहून सुटते. अजनी-कुर्ला साप्ताहिक एक्स्प्रेस शनिवारी, तर निझामाबाद-कुर्ला साप्ताहिक रेल्वे सोमवारी असते. दोन्ही साप्ताहिक गाड्या औरंगाबादहून सकाळी ६.२५ वाजता निघतात.
तपोवनवरवाढता ताण : तपोवनएक्स्प्रेस नांदेड येथून सकाळी १०.१० वाजता निघाते. तत्पूर्वी धर्माबाद-मनमाड पॅसेंजर नांदेडहून सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास निघते, आैरंगाबादला दुपारी २.३५ वाजता पोहोचते. ती मुंबईला रात्री १० वाजता पोहोचून सकाळी ६.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघते.

प्रबोधनाची गरज
*रेल्वेचीसंपत्ती ही राष्ट्राची संपत्ती असल्याची जाणीव प्रवाशांना करून देण्याची गरज आहे. रेल्वेकडून वेळेवर देखभाल दुरुस्ती केली जाते. स्वच्छतेसंबंधी पाहणी केली जाते दोषी आढळणाऱ्या यंत्रणेवर कारवाई केली जाते. तपोवनची आपण स्वत: पाहणी करणार आहोत. जी.अप्पाराव, विभागीयमेकॅनिकल इंजिनिअर, नांदेड.

तपोवनच्या वातानुकूलित डब्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. फायर एक्स्टिंग्विशर खुर्च्यांखाली पडले आहे. कचराही उचलण्यात येत नाही.

दुरुस्तीसाठी आग्रह
*नांदेडविभागीय व्यवस्थापकांकडे तपोवनच्या देखभाल दुरुस्ती झालेल्या वातानुकूलित डब्यासंबंधी तक्रार करण्यात येणार आहे. वातानुकूलित डबा बदलून देण्यात यावा. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद येथील कार्यालयाकडून नेहमीच मराठवाड्यात धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना दुजाभावाची वागणूक दिली जाते. वेळच्या वेळी दुरुस्ती होत नसल्याची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल. अर्जुनगायके, सदस्य,विभागीय रेल्वे उपभोक्ता समिती, औरंगाबाद