आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्‍ये शिव कॉलनीत घराची ग्रील कापून घरफोडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-शिवकॉलनीत शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्याने घराची ग्रील कापून ४७ हजारांचा ,ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिव कॉलनीतील नरेंद्र भालचंद्र कुलकर्णी (वय ७२) यांच्या घरात शुक्रवारी पहाटे ते वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने खिडकीखाली लावलेली होंडा अॅक्टिव्हा गाडीवर चढून खिडकीच्या ग्रील कापल्या. त्यानंतर घरात प्रवेश केला. या वेळी कुलकर्णी कुटुंबीयांसह घरात झोपलेले होते.
चोरटा कुलकर्णीं यांच्या पँटच्या खिशातील ३० हजार आणि १७ हजार किमतीचा सॅमसंग कंपनीचा एलसीडी टीव्ही चोरून जात असताना कुलकर्णी यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी आरडा-ओरड केली तोपर्यंत चोरटा पसार झाले होते. दरम्यान, चोरट्याने डोक्यावर बुचडा बांधलेला होता. या प्रकरणी त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.