आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Activist Bicout To Mundes Rally At Aurangabad

मुंडेंच्या उपस्थितीतील महोत्सवाला सेनेचे लोकप्रतिनिधी गैरहजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या सिद्धा महोत्सवाला शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी गैरहजेरी लावली. त्यामुळे शिवसेना -भाजप युतीमधला तणाव याला कारणीभूत असल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. दरम्यान, पंकजा ही मराठवाड्याची कन्या आहे. आपल्याला या कार्यक्रमाची माहिती नव्हती अन्यथा कार्यक्रमाला हजेरी लावली असती, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, डॉ. भागवत कराड, प्रवीण घुगे यांची उपस्थिती होती. मात्र, निमंत्रणपत्रिकेत नाव असलेले एकही आमदार फिरकले नाहीत. शहरात कोणताही महत्त्वाचा, शासकीय कार्यक्रम असला तर त्यास शहराच्या प्रथम नागरिक महापौरांना विचारले असता त्यांनी निमंत्रण मिळाले होते. मात्र, गुरुवारी शहराबाहेर असल्याचे सांगितले.