आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाच्या पदाधिका-यांना युतीसाठी शिवसेनेचे साकडे, धुरिणांकडे भाजपला राजी करण्याची विनंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपने समांतरवरून आक्रमक पवित्रा आणि एमआयएमचा धसका यामुळे शिवसेना युतीसाठी घायकुतीला आली आहे. आतापर्यंत संघ म्हणजे फक्त चर्चा करणा-यांचा गट असे म्हणणा-या सेनेच्या पदाधिका-यांनी संघाकडे युतीसाठी साकडे घातले आहे. आम्ही तयार आहोत, भाजपला युतीसाठी भाग पाडा, अशी विनंती शिवसेनेच्या स्थानिक वरिष्ठांनी संघाच्या शहरातील आजी-माजी पदाधिका-यांकडे केली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी मुंबईहून येताच संघाच्या या धुरिणांच्या भेटी घेत भाजपची भूमिका त्यांच्यासमोर मांडली आहे.

मागील पंधरा दिवसांपासून शिवसेना व भाजपचे युतीचे गुऱ्हाळ सुरूच आहे. दररोज किमान एक बैठक होते, दोन्ही पक्ष रोज नवे पर्याय समोर ठेवतात व बोलणी लटकतात. मध्येच भाजपचे मुंबईतील नेते लक्ष घालतात, तर शिवसेनेचे कोअर कमिटी सदस्य मुंबईला चर्चेसाठी जाऊन येतात. युती होणार असे दोन्ही पक्ष जाहीर सांगत असले तरी भाजपने शिवसेनेला फारसे न मोजता त्याची फरपट करायचे ठरवले आहे.

दुसरीकडे युती झाली नाही तर यश मिळवणे अवघड असल्याचे शिवसेनेच्या ध्यानी आल्याने त्यांनी लकडा सुरूच ठेवला आहे. पण भाजपने ताठर भूमिका घेत शिवसेनेला खेळवणे सुरू केले आहे. शिवाय शिवसेनेला अडचणीत आणणा-या समांतरवर जोरदार हल्ला चढवला आहे. युती झाली नाही तर तो तीव्र होत जाणार आहे. आता उमेदवारी अर्ज भरायचे शेवटचे दोन दिवस असल्याने युतीबाबत निर्णय घ्यावा व यादी जाहीर करून बाकीची तयारी करता येईल, अशी शिवसेनेची मागणी आहे. भाजपकडून प्रतिसाद नसल्याने अखेर कालपासून सेनेच्या स्थानिक नेत्यांनी थेट भाजपची मातृसंस्था असणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच मध्यस्थी करण्याचे आवाहन केले आहे. सेनेच्या नेत्यांनी काल व आज संघाच्या आजी-माजी पदाधिका-यांशी व धुरिणांना भेटून युती कशी आवश्यक आहे व भाजप प्रतिसाद देत नसल्याने युती न झाल्यास काय संकट येऊ शकते याबाबत सांगण्यात आले.

पुढे वाचा... तक्रारीही केल्या