आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीचा तिढा सुटेना, सेनेचे पदाधिकारी पुन्हा मुंबईत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पालिका निवडणुकीत शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यात युती होणार नाही, ही शंका दिवसेंदिवस आणखी गडद होत चालली आहे. दरम्यान, युतीसाठी गुरुवारी सायंकाळी शिवसेना पदाधिकारी तातडीने मुंबईला रवाना झाले. मात्र, भाजपचे स्थानिक पदाधिकारी शहरात असल्याने ही सेनेची अंतर्गत बैठक असल्याचा दावा सूत्रांनी केला.

७ एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून त्याआधी युतीचा निर्णय अंतिम करायचा असेल, तर हाती फक्त तीनच दिवस आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळी जर या दोन्ही पक्षांत निर्णय होऊ शकला नाही, तर मात्र युतीचे काही खरे नाही, असा दावा दोन्ही पक्षांतील स्थानिक सूत्रांकडून करण्यात येत आहे.

पुढे वाचा... भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्ष कार्यक्रमानिमित्त गुरुवारी बंगळुरूला गेल्याने नियोजित बैठक झाली नाही.