आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती तळ्यात, मळ्यात की गाळात? भाजप नेते बैठकीकडे फिरकलेच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना-भाजपची युती होणार असा छातीठोक दावा दोन्हीही पक्षांकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात ही युती तळ्यात असेल मळ्यात असेल की गाळात जाईल, याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे युती होणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

गुरुवारी सकाळी पुन्हा मुंबईत एकदा बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी टळलेली बैठक होईलच, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही.शहरात पाच बैठकांत एकमत न झाल्याने बैठकीच्या फे-या मुंबईकडे वळत्या झाल्या. पहिल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने बुधवारी सायंकाळी मुंबईत ज्येष्ठ नेत्यांची पुन्हा बैठक होणार होती. शिवसेनेचे अनिल देसाई, विनोद घोसाळकर, रामदास कदम हे नेते भाजपनेते तथा मंत्री विनोद घोसाळकर यांच्या बंगल्यावर दाखलही झाले होते. परंतु प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत आले, त्यांच्याशी चर्चा करायची आहे, असे सांगत बैठकीसाठी अपेक्षित असलेले सर्वजण तिकडे निघून गेले. रात्री ११ वाजेपर्यंत प्रतीक्षा करून सेना नेतेही आपापल्या घरी परतले.
पुढे वाचा, राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जागा लढवणार