आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या दौऱ्यावर शिवसेनेचा बहिष्कार? नेते, मंत्री, कार्यकर्ते फिरकलेच नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या सोमवारच्या औरंगाबाद दौऱ्यावर शिवसेनेने बहिष्कार टाकल्याचे चित्र होते. प्रोटोकॉलनुसार पालकमंत्री तसेच स्थानिक खासदार आमदार राज्यपालांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात मंत्री, नेते तर सोडाच, कार्यकर्तेही फिरकले नाहीत.

विद्यापीठ प्रशासनाने थेट ऐनवेळी विचारणा केल्याबद्दल उपनेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली. मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागल्याने औरंगाबादला येऊ शकलो नसल्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले, तर विद्यापीठातील कार्यक्रम हा अल्पसंख्याकांचा होता. तसेच अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा निर्णय अजून रद्द झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेने बहिष्कार घातला असावा, असे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. राज्यपालांचे कार्यक्रम हे अराजकीय असतात. त्यात शिष्टाचारानुसार स्थानिक लोकप्रतिनिधींना आवर्जून बोलावले जाते अन् त्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असते.
आजपर्यंत तसेच होत आले आहे. परंतु सोमवारच्या राज्यपालांच्या दौऱ्याच्या वेळी भाजपचे मंत्री आवर्जून आले होते. परंतु सेनेच्या मंत्र्यांनी या दौऱ्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हाच सेनेचा या दौऱ्यावर बहिष्कार असल्याचे चित्र दिसून आले. विद्यापीठासह शहरातील अन्य दोन कार्यक्रमांच्या वेळी राज्यपालांसोबत सेनेचे लोकप्रतिनिधी दिसले नाहीत. याची प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. खडसे यांनी घेतल्या पत्रकार परिषदेतही हा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा खडसे यांनी शिवसेना ही अल्पसंख्याकविरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्यांचे मंत्री अन्य कार्यक्रमांत असावे, असेही सांगितले. उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हेदेखील कोकणाच्या दौऱ्यावर असल्यामुळे येथे येऊ शकले नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

पुढे वाचा.. खैरे,धूत यांचे सोफे ऐनवेळी हलवले