आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनवाणी नकोत म्हणून शिवसेनेतूनही फोनाफोनी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माजी आमदार किशनचंद तनवाणी हे भाजपचे शहराध्यक्ष होऊ नये यासाठी शिवसेनेतूनही भाजपच्या काही नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडे फोनाफोनी करण्यात आली. फिल्डिंग लावा, तुमचे काम होईल, असे सेनेतून सांगण्यात आल्यानंतर भाजपमधील एका गटाने गुरुवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे धाव घेतल्याचे सांगण्यात येते.
सेनेतून आलेल्या तनवाणींना भाजपचे शहराध्यक्षपद देण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. तसे त्यांनी वरिष्ठांना बोलावूनही दाखवले होते, तरीही तनवाणीच शहराध्यक्ष होतील, असे संकेत हेच पदाधिकारी देत होते. ही माहिती सेनेतील काही नेते, पदाधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर तनवाणी यांना वेळीच रोखण्याचा सल्ला सेनेतून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तनवाणी भाजपकडून शहराध्यक्ष झाले तर शिवसेनेची अडचण होईल, अशी सेनेतील नेत्यांची अटकळ आहे. त्यामुळेच तनवाणी यांनी स्वगृही यावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. मोठे पदही दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र तनवाणी यांनी पुन्हा परत येण्यास नकार दिला होता. दुसरीकडे तनवाणी यांनी जोरदार संघटना बांधणी केली तर आपण मागे फेकले जाऊ अशी भीती भाजपमधील धुरीणांना आहे. त्यामुळेच ऐनवेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्षांकडे धाव घेतली.
पुढे वाचा.. भाजपमध्ये असे होत नाही