आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या कोंडीसाठी शिवसेना सरसावणार, आर्थिक नाड्या सांभाळण्यासाठी देणार तगडा सभापती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात भाजपसोबत चांगलेच फाटत अाल्याने स्थानिक पातळीवरही भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेना आगामी काळात सरसावणार आहे. मनपा स्थायी समिती सभापतीच्या नियुक्तीच्या वेळीच भाजपच्या आगामी महापौराला चाप देण्यासाठी सेना आताच तगडा सभापती देऊन कोंडी करण्याच्या विचारात आहे. त्या दृष्टीने महापालिकेचे सखोल ज्ञान असणाऱ्यांना या वेळी संधी दिली जाण्याची शक्यता असून त्यासाठी राजू वैद्य, नंदकुमार घोडेले विकास जैन यांची नावे चर्चेत येत आहेत.

शिवसेना भाजपचे संबंध सर्वच पातळ्यांवर ताणले जात असताना त्याचे पडसाद औरंगाबादेतही उमटणार आहेत. मनपाच्या सत्ताकारणात भागीदार असणाारे हे दोन पक्ष आगामी काळात आमने -सामने उभेही राहू शकतात. हे चित्र स्थायी समितीपासूनच बघायला मिळणार आहे. १६ सदस्यांच्या स्थायी समितीतील सदस्य या महिनाअखेर निवृत्त होतील. त्यांच्या जागी नव्यांची वर्णी लागेल. सध्या स्थायी समितीचे सभापतिपद भाजपकडे आहे. आता दोन्ही पक्षांतील करारानुसार हे पद शिवसेनेकडे येणार आहे, तर सध्या दीड वर्षासाठी शिवसेनेकडे असलेले महापौरपद नंतर भाजपकडे जाणारा आहे. अशीच अदलाबदल उपमहापौरपदाबाबतही हाेईल. मनपाच्या आर्थिक नाड्या सांभाळणारे सभागृह अशी स्थायीची ओळख असते. एका अर्थाने मनपाची ती तिजोरीच असून त्या माध्यमातून बरेच काही साध्य करता येऊ शकते. त्यामुळे आगामी काळात भाजपसोबत उडणारे खटके पाहता सभापतिपद तगड्या नगरसेवकाकडे देण्याचा विचार शिवसेनेत सुरू झाला आहे. याशिवाय आगामी काळात भाजपकडून भगवान घडामोडे अथवा राजू शिंदे यांच्यातून एखाद्याला महापौरपद दिले जाऊ शकते. अशा स्थितीत भाजपला चाप लावण्यासाठी स्थायीच्या चाव्या अनुभवी व्यक्तीकडे असाव्यात, अशी रणनीती शिवसेना आखणार आहे.
पुढे वाचा, वैद्य, घोडेले यांच्या नावांची चर्चा, खासदार खैरेंना संघटनात्मक कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा डाव ​